जिला

अधिवक्ता संघ अर्धापूरच्या वतीने नवनियुक्त नोटरी धारकांचा सत्कार

अॅड.सचिन देशमुख यांच्या वतीने विशेष सत्कार.

 

 

 

अर्धापूर:- उध्दव सरोदे – नुकत्याच राज्यात व देशात नोटरी बिषयी जागेची पदभरती घेण्यात आली त्यामध्ये अर्धापूर तालूक्यातून भारत सरकार मार्फत नोटरी म्हणून मिळालेले अधिवक्ता संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.राम जोगदंड,अॅड. बालाजी कदम,अॅड.आत्माराम राजेगोरे,अॅड.रावसाहेब देशमुख व अॅड.सय्यद इम्रान आदिंना नोटरी प्राप्त झाली म्हणून अधिवक्ता संघाचे सहसचिव अॅड.सचिन देशमुख यांनी नवनियुक्त नोटरी धारकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे नियोजनबध्द आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमा प्रसंगी नवनियुक्त नोटरी धारकांना उपस्थित विधिज्ञांनी अभिनंदन करून शुभेच्छा देत बोलताना म्हणाले की,आपण नोटरीला फक्त व्यवसाय व उत्पन्नाचे साधन म्हणून न बघता एक सामाजिक कर्तव्य व लोकांना आपल्या तर्फे जमेल तसे सहकार्य व्हावे या हेतूने आपण नोटरी व्यवसाय करावा असे मनोगत व्यक्त केले. यावेळी अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड.किशोरजी देशमुख,ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.डि.बी.दासे,अॅड. ए.आर.चाऊस,अॅड.बी.व्ही.नवले,

अॅड.बी.एस.मगरे,अॅड.जी.बी.पत्रे,अॅड.सचिन देशमुख,अॅड.डि.एम. लोणे,अॅड.गौरव सरोदे,अॅड.नितेश लोणे,अॅड.मंगेश सरोदे,अॅड.रोहित देशमुख,अॅड. ओमकार देवडे,अॅड. किरण साबळे,पैरवी अधिकारी रामराव घुले व ईतर विधिज्ञांनी नोटरी धारकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *