क्राईम

विद्यार्थींनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकास फाशीची शिक्षा द्या – अर्धापूर तालूका,शहर काँग्रेस व महाविकास आघाडीची मागणी

 

अर्धापूर:- उध्दव सरोदे- तामसा येथील एका शाळेतील अल्पवयीन विद्यार्थींनीवर सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापका विरूद्ध जलद गतीने प्रकरण चालवून फाशीची शिक्षा द्यावी तसेच मुलीचा गर्भपात करणारे डॉक्टर व ईतर दोषींवर ताबडतोब कार्यवाही करावी अशी मागणी अर्धापूर तालूका, शहर काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे केली आहे.

तामसा ता.हदगांव येथील अल्पवयीन मुलीवर पिण्याच्या पाण्यामध्ये गुंगीचे औषध देवून लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पिडीत विद्यार्थींनी गर्भवती झाल्यानंतर तिला नांदेड येथील एका रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात करण्यात आला.वारंवार मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना तामसा येथे उघडकीस आली असून संबंधित आरोपी संबंधित आरोपी मुख्याध्यापकाचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून त्यास फाशीची शिक्षा द्यावी व गर्भपात करणारे डॉक्टर,त्यांचे दोषी आढळणारे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन अर्धापूर तालूका, शहर काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष सुनिलराव वानखेडे,प्रल्हादराव सोळंके, बाळासाहेब देशमुख आंबेगावकर, शेख मकसूद,शेरू पठाण, शबाना बेगम,मो.गौस कुरेशी,अॅड.गौरव सरोदे,काझी सलाउद्दीन,अजरउल्ला खान पठाण,अरविंद क्षिरसागर, कदम पुंडलिक,चंद्रकांत शिंदे आदींनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *