जिला
अर्धापूर न्यायालयात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

अर्धापूर:- उध्दव सरोदे – येथील न्यायालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अधिवक्ता संघ अर्धापूरच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले व उपस्थित विधिज्ञांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर विचार मांडून मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित अधिवक्ता संघाचे सचिव अॅड.दिपक लोणे,सहसचिव अॅड.सचिन देशमुख,कोषाध्यक्ष अॅड.गजानन पत्रे,सदस्य अॅड. भानुदास मगरे,अॅड.बालाजी नवले,अॅड.आत्माराम राजेगोरे, अॅड.रावसाहेब देशमुख,अॅड.गौरव सरोदे,अॅड.मंगेश सरोदे,अॅड.रोहित देशमुख,अॅड.ओमकार देवडे,पैरवी अधिकारी रामराव घुले,न्यायालयीन कर्मचारी माधव तेलंग आदि उपस्थित होते.



