चौफाळा व देगलूर नाका ते 33 केव्हीला पूर्णवेळ अभियंता मिळेना

नांदेड दि. 22 नांदेड शहरातील चौफाळा आणि देगलूर नाका परिसरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासाठी पूर्णवेळ अभियंता मागील अनेक वर्षापासून मिळत नसल्यामुळे या भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे मागील काही काळापासून पूर्णवेळ अभियंता नसल्यामुळे नागरिकांना नवीन रिच कनेक्शन घेण्यासाठी आणि नादुरुस्त असलेले मीटर बदलून मिळण्यासाठी अनेक वेळा या कार्यालयाला खेटे मारावे लागत आहेत त्याचबरोबर पूर्णवेळ अभियंता नसल्याने वीज
वितरण आणि महापारेषण चे कर्मचारी हे आपले कर्तव्य बजावण्यात कसूर करत आहेत अनेक वेळा या भागातील विद्युत पुरवठा तासंतास खंडित राहतो त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतात तरी याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन मुस्लिम बहुल भाग असलेल्या चौफाळा व देगलूर नाका परिसराला पूर्णवेळ अभियंता देऊन रमजानच्या महिन्यात विजेमुळे होणारी गैरसोळ टाळावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे



