प्रविण रावते यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र योध्दा संस्थाचालक सेवारत्न पुरस्कार जाहीर लवकरच पुण्यात होणार पुरस्कार प्रदान

अर्धापूर :- उध्दव सरोदे / शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतिने दरवर्षी राज्यस्तरीय महाराष्ट्र योध्दा संस्थाचालक सेवारत्न पुरस्कार देण्यात येतो.या वर्षीचा पुरस्कार अर्धापूर शहरातील एज्युव्हिजन इंग्रजी शाळेचे संस्थाचालक प्रविण शंकरराव रावते यांना जाहीर झाला असून लवकरच तो पुरस्कार पुण्यात होणार प्रदान.अर्धापूर शहरातील अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या एज्युव्हिजन इंग्रजी शाळेचे संस्था चालक प्रविण शंकरराव रावते यांनी
इंग्रजी शाळेमध्ये राबविण्यात आलेले विविध शैक्षणिक उपक्रमांची दखल घेवून त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतिने राज्यस्तरीय महाराष्ट्र योध्दा संस्थाचालक सेवारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.महाराष्ट्र फाउंडेशनच्या सचिव अँड.लावण्या आडम यांनी निवडीचे पत्र पाठवले आहे.एज्युव्हीजन इंग्रजी शाळेचे संस्थाचालक प्रविण शंकरराव रावते यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र योध्दा संस्थाचालक सेवारत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षक प्रतीक सावरकर,
आशुतोष पुरी,शाळेच्या प्राचार्या सौ.प्रिया रावते,सौ.अंजली जडे,सौ. छाया क्षीरसागर,सौ.स्वाती पांचाळ, सौ.अलका धुमाळ,सौ पूजा घोलप, सौ.मनीषा शिनगारे,अभिषेक गुरखेल, तुकाराम माटे,अविनाश काळे यांच्यासह पत्रकार,विधिज्ञ ईतर प्रतिष्ठीत मंडळी व अर्धापूर शहर व तालुक्यातील पालकवर्ग, नागरिकांनी अशा अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



