मराठवाडा
मॅग्मो संघटनेच्या राज्य कोषाध्यक्ष पदी डॉ.राजेंद्र पवार यांची निवड

नांदेड :- लोकशाही मार्गाने आणि सुरळीतपणे पुणे येथे पार पडलेल्या मॅग्मो निवडणुकीत विजयी झालेले राज्यध्यक्ष पदी डॉ.राहुल कन्नमवार (नागपूर), सरचिटणीस पदी डॉ. हिंदोळे (लातूर ) व राज्य कोषाध्यक्ष पदी नांदेड जिल्हा प्रशिक्षण संघ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पवार यांची निवड करण्यात आली.
डॉ राजेंद्र पवार यांची राज्य कोषाध्यक्ष पदी निवड झाल्या बदल शुभेच्छा देतांना मा.डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर, मॅग्मो संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष डॉ अमर चव्हाण सर, वैद्यकीय अधिकारी डॉ राठोड सर, डॉ डवले सर, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी शुभेच्छा दिल्या.



