नांदेड येथे आयुक्तालय स्थापन साठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची भेट घेऊन नांदेड येथे आयुक्तालय स्थापन करण्याबाबत चर्चा केली. यावेळी बावनकुळे साहेब यांना मागण्याचे निवेदनही सादर केले. नांदेड जिल्हा हा मराठवाड्यात सर्वाधिक 16 तालुके असलेला जिल्हा असून जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 10,528 चौ. किमी आहे.
नांदेड येथे महसूल आयुक्तालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही बाब लक्षात घेता मागील आठवड्यात झालेल्या नांदेड दौर्यात आयुक्तालयाचा प्रश्न निकाली काढण्याबाबत आपण आश्वासन दिले होते, याची आठवण मंत्री बावनकुळे साहेब यांना करून दिली.
नांदेड जिल्ह्यात सोळा तालुक्यात यापूर्वी 80 महसूल मंडळे असून 457 तलाठी सजा होते.पुनर्रचनेनंतर महसूल मंडळांच्या संख्येत 14 ने वाढ झाली असून एकूण 93 महसूल मंडळे व 541 तलाठी सज्जे झाले आहेत.कामाचा वाढता आलेख पाहता भौगोलिक दृष्टीने आयुक्तालय नांदेड येथेच झाले पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी आहे.
या मागणीचा सकारात्मक विचार करून त्वरित निर्णय जाहीर करावा, अशी मागणी नांदेडकरांच्या वतीने यावेळी केली.
महसूल आयुक्तालय प्रश्नी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढू आणि आपल्या मागणीचा सकारात्मक विचार करू,असे आश्वासन दिले आहे.



