जिला

वादग्रस्त शास्त्रीनगर गृहनिर्माण सहकारी संस्था- म. किनवटच्या विरोधात आमरण उपोषणाला बसणार

 

किनवट (ता.प्र) किनवट येथील वादग्रस्त शास्त्रीनगर गृहनिर्माण सहकारी संस्था- म. किनवटच्या विरोधात मूळ सभासद माजी नगरअध्यक्ष ईसा खान सरदार खान, युसुफ नजर अली खान, तिरुपती नेमानीवार ठाकूर हे दिनांक २० मार्च २०२५ रोजी नांदेड येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

पुढे निवेदनात असे ही नमुद केले आहे की शास्त्रीनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेचा कारभार हा सहकार कायदा, अधिनियम 1960 च्या नियम आणि संस्थांचे उप विधी या नुसार चालत नाही. सहकार कायदया प्रमाणे कारभार सांभाळण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाची असते. परंतु असे असताना सुध्दा ठराव क्र 06 विषय सभासदांना मान्यता देने बाबद, च्या ठरावास युसुफ अली नजर खान यांची सूचक म्हनून नावाची नोंद असल्याचे दिसत असल्याने सदरील ठरावास माझी सूचक म्हणून मला विचारात घेतले गेले नसल्याचे युसुफ यांचे म्हणने आहे.

तसेच महारष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 35 नुसार या घेतलेल्या ठरावाची मान्यता घेणे आवश्यक आहे. असे असताना सहायक निबंधक कार्यालयाची मंजुरी घेतली गेली नसल्याने तो ठराव कायदेशीर रद्द करुन न्याय द्यावा आम्हाला सभासद बहाल करुन आमचे भूखंड आमच्या ताब्यात द्यावे व तसेच चेअरमन हनमंतलू दडगेलवार यांनी संस्थे मध्ये परिवारातील सदस्य नातेवाईक यांची नावे समाविष्ठ केली असल्याने ते बेकायदेशीर आहे ते रद्द करण्यात यावे तसेच हांनमंतलू दडगेलवार यांच्या मृत्यू पश्चात त्यांचं मुलगा रामकृष्णा दडगेलवार यांची निवड झाली आहे ही निवड कोणत्या आधारे झाली हे कळायला मार्ग नाही.

तसेच संस्थेच्या निवड‌नुकीची माहीती सदस्याना विश्वासात न घेता. व संस्थेचे सर्व साधारण सभा, बँक खात्याचा तपशिल नाही म्हणून महाराष्ट्र सहकारी संख्या अधिनियमातील नियम आणि तरतु‌द‌ीचे उल्लघंन करून कर्तव्यात कसुर केल्याने अधिनियम 1960 चे कलम 154 (ब) 23 (1) नुसार कार्यवाही करून जवाबदारी पार पाडयात कचूराई दाखविल्याचा ठपका ठेउन सहकारी संस्था अधिनियमाचे कलम 154 (ब) 8(1) (2) नुसार कार्यवाही करून तात्काळ संस्थेवर प्रशासक (administrator) लावणे अन्यथा जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर दिनांक 20 मार्च 2025 रोज गुरूवारला आमरण उपोषणाला बसत असल्याचे नमुद केले सदरील निवेदनाच्या प्रती प्रधान सचिव सहकार मंत्रालय मुंबई, आयुक्त सहकार पुणे विभागीय सह निबंधक लातूर, जिल्हाधिकरी नांदेड जिल्हा उपनिबंधक नांदेड यांना दिले आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *