दिल्लीचे धुके नव्हे तर वाजेगाव ते आमदुरा रस्त्यांची दुरावस्था होय

नांदेड दि. 7 मागील अनेक महिन्यांपासून वाजेगाव ते आमदुरा या रस्ता निर्मितीचे काम सुरू आहे पण अद्यापही ते काम पूर्णत्वास गेले नाही या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे तर आहेतच पण रस्ता तयार करत असताना रस्त्यावर जी माती टाकली आहे त्या मातीमुळे प्रचंड धूळ उडत आहे. रस्ता तयार करत असताना ही धूळ युक्त माती का वापरली जात आहे हेही न समजण्यापलीकडचे कोडे आहे. कदाचित यामध्ये काहीतरी अर्थपूर्ण व्यवहार असेल जो कंत्राटदारालाच माहीत.

त्याचबरोबर रस्त्यावरून दुचाकी स्वार जात असताना मोठमोठे कंटेनर, हायवा व जेसीबी यासारख्या गाड्या याच रस्त्यावरून ये जा करत असतात त्यामुळे प्रचंड असे धुळीचे लोट उठत आहेत. यामुळे कधी कधी असा भास होतो की कदाचित हे दिल्लीचे धुके तर नव्हे या धुळीमुळे अनेक वेळा दुचाकीचे अपघात देखील झाले आहेत. पण या भागातील प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय प्रतिनिधी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसते आणि याचा त्रास सर्वसामान्य लोकांना रोज सहन करावा लागत आहे त्यामुळे प्रशासनाने आणि या भागातील तथाकथित राजकीय प्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन किमान रस्त्यावर रोज धुळ उडू नये म्हणून पाणी मारण्याची तरी व्यवस्था करून घ्यावी.
ज्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. असेही नांदेड मधले सर्व कंत्राटदाराची कार्य ही राजकीय व प्रशासकीय अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे भगवान भरोसे होत असल्याचे दिसून येते, असो या धुळीमुळे वाजेगाव ते आंदोरा रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिल्लीतील धुक्याचा आनंद मिळत आहे हेही काही थोडके नव्हे.



