देश विदेश

गौरवदिन 8 मार्च

 

*सखे !आज म्हणे तुझा गौरव दिन आहे .*
*अग खुळे !तुझाही आहेच की.*
*अरेच्चा! खरंच की आज माझा गौरव दिन 8 मार्च विसरलेच हल्ली फारच विसरायला होतं मला मी स्री आहे हे ही हल्ली मला फारसं उमगत नाही . रोबोट सारखी दिवसभर कामात गुंतलेली .*
*मला आजही स्पष्ट आठवतो तो दिवस .मी दहा-बारा वर्षांची असताना चुलीवर तोडकीमुडकी , तळहाताएवढी भाकर तव्यावर टाकली व अर्धी कच्ची व एका बाजूने करपलेली भाकर बाबांना दाखवली .बाबांनी न्याहाळत ती भाकर पाहिली आणि पाठीवर थाप दिली व म्हणाले ,बाय माझी! किती छान भाकर केली मला खूप भूक लागली दे आणि मला खाऊ दे. खरं सांगू सखे! तो माझ्या आयुष्यातील खरा गौरवदिन.

*मुलगी जसजशी वयात येत जाते. तस तशी तिच्या भोवती बंधनांची कुंपणं अधिक घट्ट होते. भारतीय परंपरेतील स्त्री मला तर कधी स्वतंत्र दिसलीच नाही. हं प्रत्येकीचे मत वेगळे असू शकते.*
*कधीकाळी भारतात मातृसत्ताक पद्धती नांदत होती. किती अलबेल होतं सगळं. सत्ता जरी स्त्रियांच्या हातात असली तरी, ती पायरी सोडून कधीही वागली नाही. मोठ्यांचा आदर ,घराची काळजी, नवर्याचा मान ,मुलांचे संगोपन हे अगदी कुशलतेने तिने सांभाळले .कुणावरही कसली सक्ती किंवा कुणाचाही अनादर तिने केला नाही*.
*हळूहळू परिस्थिती बदलत गेली. काही मूठभर लोकांनी आपल्या स्वार्थासाठी राजगादीवरच्या स्त्रीला*
*खालच्या पायरीवर आणून ठेवले. दासीच्या जर्दारीला व अतिक्षुद्रात तिची गणना होऊ लागली.*
*मग काय सुरू झाली तिची दयनीय अवस्था. चूल आणि मूल या चक्रात तिचीफरपट सुरू झाली .ना शिक्षण ,ना निर्णय क्षमता, न बोलण्याचे स्वातंत्र्य, ना चारचौघात हसण्याची मुभा. मान वर करून चालण्याची ही मनाई असे .अशाही अन्यायाने पछाडलेल्या परिस्थितीत ती अगदी प्रामाणिक राहिली. आपल्या घराशी, रुढीशी, परंपरेशी .नवरा गेल्यावर मुंडन केलं ,सती गेली तोंड बंद ठेवून सार सहन करत राहिली

*स्त्रीरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यातील प्रत्येक स्त्रीला आई बहिणीचा सन्मान दिला. तिच्याकडे वाकडे नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे काढून हातात दिले .शंभू महाराजांना आपल्या पान्ह्याचीअमॄत धार पाजणाऱ्या धाराऊस मातेच्या दर्जा दिला. अगं! एवढेच काय शत्रूच्या स्त्रीचा चोळी बांगडी देऊन आहेर केला व सन्मानपूर्वक तिची पाठवणी केली सुरक्षितपणे. तो दिवस म्हणजेच आपला गौरव दिन.*
*म्हणतात ना काळ बदलत राहतो. तिचाही काळ बदलला या अन्यायाला वाचा फोडणारे नर जन्माला आले महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांनी स्त्री उद्धाराचे रणशिंग फुंकले.*
*हळूहळू ती शिकू लागली, बोलू लागली, तिची वाचा तिला कळू लागली.तिचे सामर्थ्य तिला बळ देऊ लागले. समानतेचे तांबडे फुटले. ज्ञानाचा लक्ख प्रकाश तिच्याही अंगणी पडला. त्या ज्ञानाच्या टिपूर चांदण्यात ति नखशिखांत नाहूण निघाली.*
*आणि हो सखे! पाटीवर जेव्हा लेखणीने पहिले अक्षर ती गिरवत होती, तेव्हा तिनेच तिला न्याहाळून पाहिलेला दिवस म्हणजे तिच्या गौरव दिन*.

*आजही मी रस्त्याने जाताना बऱ्याच महिला कामगार लगबगीने कामावर जाताना पाहते. मग त्या शेतकरी असो रस्त्यावर काम करणार्याअसो नोकरीवाल्या असो. कुठल्याही पदावरच्या असो.*कंबर मोडे स्तर काबाडकष्ट करतात. दिवसभर आपल्या घामाच्या एका थेंबान घराचा स्वर्ग करतात.*
*पूर्वी कामाचे बारा तास होते .यामध्ये मात्र स्त्रियांची फारच ओढाताण होत असे. मग स्त्रीचे गरोदर पण असो, लहान बाळ असो.घरातील सगळी कामं करणे तारेवरची कसरत व्हायची. त्यात घराच्या, मुलांच्या सुखासाठी उपास तापास करणे. इतकं असूनही कुठल्याच देवाला तिची कधीच दया आली नाही.*नऊ महिन्याचे पोट घेऊन काम करताना कधीच कोणता देव धावून आला नाही तिच्या मदतीला*.
*मग काय एका महासौरीने जन्म घेतला. आणि सगळं कसं चित्रच पालटलं स्त्रियांच्याकष्टाची जाणीव घेऊन तिला यातून मुक्त श्वास घेता यावा, तिचे आयुष्य सुखकर व्हावे, यासाठी डॉ. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल बनवलं तो म्हणजे तिचा गौरवदिन.*
*बारा तासाचे काम बंद करून आठ तासावर आणले .बाळांतपणाची सुट्टी मंजूर करून घेतली तो म्हणजे तिच्या खरा गौरव दिन.*

*सखे! मला वाटतं नुसत्या मेणबत्त्या जाळून किंवा निषेध !निषेध! म्हणून काहीही बदल होणार नाही. तीन वर्षांची चिमुरडी असो की 70 वर्षाची म्हातारी ती आजही सुरक्षित नाही .मग आपण कोणता गौरव दिन साजरा करायचा. आपली सुरक्षा कोण करेल .भाषण बाजी आणि हार तुरे यातून काहीही निष्पन्न होणार नाही.*
*आता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ .बाबासाहेब आंबेडकर जन्माला यावे लागतील. तेव्हाच आपला गौरव दिन खऱ्या अर्थाने आपण साजरा करू.*
*काय पटतंय ना!*

माया भद्रे
गुजराती प्रा.शा.नांदेड
8055342495

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *