जिला

पुण्याचे नामवंत व्याख्याते अशोक देशमुख यांचे ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर नांदेडमध्ये आज व्याख्यान

सकाळी विद्यापीठात तर सायंकाळी आयआयबी इन्स्टिट्यूट मध्ये होणार व्याख्यान

 

नांदेड, 10- पुण्याचे नामवंत व्याख्याते अशोक देशमुख ज्यांची आतापर्यंत दहा हजाराहून अधिक व्याख्याने झाली. त्यांचे ताणतणाव कसा कमी करावा अर्धात हसत खेळत तणाव मुक्ती या विषयावर व्याख्यान नांदेडमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आले आहे.

अशोक देशमुख हे महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत व्याख्याते असून त्यांनी आतापर्यंत दहा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. पोलीस, मंत्रालय, अधिकारी, एसटी महामंडळ, विविध सहकारी संस्था, यशदा, बार्टी, सारथी, मर्सिडीज बेंज, कोकाकोला या व अनेक संस्था, संघटना येथे त्यांचे ताणतणाव व्यवस्थापन व हसत खेळत तणाव मुक्ती या विषयावर व्याख्याने झाली आहेत. त्यांच्या व्याख्यानातून तणाव कसा कमी करावा, त्याचबरोबर जीवनात आनंदी कसे राहावे याबाबत अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन मिळणार आहे.

आज 11 मार्च रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी अकरा वाजता सिनेट हॉल येथे त्यांचे व्याख्यान होणार आहे. नांदेडचे भूमिपुत्र तथा पुण्यातील यशदा या संस्थेचे जनसंपर्क अधिकारी डॉ बबन जोगदंड व मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर किमान पाच- सहा महिने त्या व्याख्यानाची चर्चा होईल, असे त्यांचे व्याख्यान आहे.

या व्याख्यानाचा सर्व नांदेडकरांनी लाभ घ्यावा, हे व्याख्यान ११ मार्च रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळात आयआयबी इन्स्टिट्यूट कर्नाटक बँकेच्यावर श्रीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे डॉ.बबन जोगदंड, डॉ.राम वाघमारे, सोनू दरेगावकर, मिलिंद व्यवहारे, डॉ. विलास ढवळे यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *