महाराष्ट्रा

जिल्ह्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा विविध उपक्रमांच्या अमलबजावणीसह महिलांचा गौरव

 

नांदेड,8- नांदेड जिल्ह्यात जागतिक महिला दिन उत्साहात व विविध उपक्रमांच्या आयोजनाने साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील सोळाही पंचायत समिती अंतर्गत गाव स्तरावर महिला सभांचे आयोजन करून पाणी, स्वच्छता, आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चात्मक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्वच्छतेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा गौरवण्यात आला.


जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी तसेच नागरिकांच्या सहभागाने विविध कार्यक्रम पार पडले.
महिला सभांमध्ये पाणी, स्वच्छता, आरोग्य व मासिक पाळी यासारख्या विषयांवर आरोग्य तज्ज्ञांनी माहिती दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलांना मासिक पाळीविषयी आरोग्यदायी सवयींचे महत्त्व पटवून दिले. तसेच शुद्ध, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पाणी तसेच शाश्वत स्वच्छतेच्या संदर्भात तज्ज्ञ, सल्लागार तसे अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

महिला सक्षमीकरणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महिलांनी पथनाट्ये व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. बचतगटांच्या महिलांनी वॉशन रनचे आयोजन करून स्वच्छतेचा संदेश दिला. बालिका ग्रामपंचायत येरगी, ता. देगलूर येथे महिलांसाठी विशेष प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते.
महिला सक्षमीकरण व आरोग्य सुधारणा यासाठी नांदेड जिल्ह्यातील महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या उपक्रमांमुळे महिलांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत झाली असून, भविष्यातही असे कार्यक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार महिलांनी केला करण्यात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *