नांदेडच्या कौठा येथील पी.व्ही.आर टाॅकिज मध्ये ग्राहकांची होत आहे लूटमार.
३ वर्षांवरील मुलांना टिकाटाचे दर लागतात असे न सांगता खाण्याच्या पदार्थावर अव्वाचे सव्वा भाव करून लूटमार.

नांदेड प्रतिनिधी:- शहरातील कौठा येथील पी.व्ही.आर टाॅकिज मध्ये गेली बरेच दिवसांपासून सिनेमा बघायला जाणाऱ्या ग्राहकांच्या असंख्य तक्रारी बाहेर येत आहेत.सध्या छावा सिनेमा हा फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीला आला असून तो पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी होत आहे.
कोणी सिनेमा पाहण्यासाठी तिकीटाची आॅनलाईन बुकिंग करतात तर कोणी प्रत्यक्ष पी.व्ही.आर मध्ये जाऊन तिकीटांची खरेदी करतात.या दोन्ही टिकीट खरेदी प्रक्रिये मध्ये टाॅकिज चालवणारे मालक,चालक,व्यवस्थापक व कर्मचारी असे कोणीही सांगत नाहीत तसेच तिकीटाची आॅनलाईन बुकिंग करताना सुद्धा कुठल्याही प्रकारची सुचना व नियमावली दिली नाही कि, ३ वर्षांवरील मुलांना टिकाटाचे पैसे लागतात असे न कळवता जेव्हा ग्राहक टिकीट आॅनलाईन असो किंवा प्रत्यक्ष खरेदी करतो तो वयाने मोठ्या माणसांची, ३ बर्षाच्या मुलांची खरेदी करत नाही.
जेव्हा ग्राहक टिकीट घेऊन अथवा आॅनलाईन करून सिनेमा पाहण्यासाठी आपल्या संपूर्ण परिवार, मुलां बाळांसोबत सिनेमा पाहण्यासाठी जातात तेव्हा संबंधित तेथील व्यवस्थापक व कर्मचारी हे ३ वर्षाच्या वरील मुलांना बघून त्यांचे टिकीट द्या अन्यथा तूम्हाला सिनेमा पाहण्यासाठी जाऊ देता येणार नाही, अशी अडवणूक करत असताना ग्राहक याबाबत त्यांना बोलले असता ते म्हणतात की,आम्ही कोण कोणत्या गोष्टी सांगत बसांव, आम्हाला काय एकच काम आहे का, सिनेमा बघायचा असेल तर मुलांचे पण टिकीट काढावेच लागेल अन्यथा तूम्ही जेवढे टिकीट काढले आहेत त्यांचे पैसे तूम्हाला परत मिळणार नाहीत अशा धमक्या देतात.
त्याचदरम्यान ग्राहक जेव्हा सिनेमा पाहण्यासाठी आत जातात तेव्हा मधील खाण्या पिण्याच्या पदार्थांच्या वस्तूंची किंमत जर ५० रू चा पदार्थ असेल तर त्याची किंमत १५० रू, जर १०० रू चा पदार्थ असेल तर त्याची किंमत २०० रू, जर १५० रू चा पदार्थ असेल तर त्याची किंमत २५० रू अशा प्रकारच्या अव्वाच्या सव्वा किंमती वाढवणे याबाबत सुध्दा ग्राहकांनी विचारना केली तर ईथे असेच असते तूम्हाला यायचं तर या अन्यथा येवू नका अशी उलट सुलट उत्तरे देणे व ३ वर्षाच्या वरील मुलांना टिकिट लागते असे न सांगता जबरदस्तीने टिकीट घेऊन जिल्ह्यातील असंख्य ग्राहकांची फार मोठ्या प्रमाणावर लूटमार करणे चालू आहे, याबाबत मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी ताबडतोब या प्रकाराची गंभीर दखल घेवून पी.व्ही.आर टाॅकिजची शासनस्तरीय नियमाने प्रामाणिक चौकशी करून त्यांनी ग्राहकांची केलेली लूटमारीची नुकसान भरपाई देवून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येवून सदरची टाॅकिज बंद करण्यात यावी,अशी मागणी जिल्ह्यातील ग्राहक व नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.



