जिला

जागतिक महिला दिन व शाळेचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

शहराला स्वच्छ,सुंदर व हरित ठेवण्यासाठी दिवस रात्र झटणाऱ्या नगरपंचायत च्या स्वच्छता महिला कर्मचारी यांचा विशेष सत्कार.

 

 

अर्धापूर:- उध्दव सरोदे – अर्धापूर शहरातील नामांकित एज्युव्हीजन इंग्रजी शाळा आणि कोचिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने शाळेचा पहिला वर्धापनदिन तसेच जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती.रेखाताई शंकर रावते तर प्रमुख पाहुणे म्हणून अर्धापूर नगर पंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. वैशालीताई प्रवीण देशमुख, सौ.विद्याताई झीने अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अर्धापूर,नगरसेविका डॉ. सौ.पल्लवी विशाल लंगडे,सौ. वर्षाताई संदीप बंडाळे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा जिल्हा महिला मोर्चा आदि उपस्थित होते.

अर्धापूर शहराला स्वच्छ,सुंदर व हरित ठेवण्यासाठी दिवस रात्र झटणाऱ्या नगरपंचायत च्या स्वच्छता कर्मचारी यांचा विशेष सत्कार महिला दिनानिमित्त करण्यात आला.त्यानंतर महिलांसाठी विशेष अशी खेळांची मेजवानी ठेवण्यात आली होती,यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून पारितोषिक मिळवली तसेच महिला दिनानिमित्त इंग्रजी शाळे मधील महिला शिक्षकांना विशेष भेटवस्तु शाळेच्या प्राचार्य सौ.प्रिया रावते यांच्या वतीने देण्यात आल्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ.अंजली जडे, सौ.छाया क्षिरसागर,सौ.स्वाती पांचाळ सौ.अल्का धुमाळ,सौ.पुजा घोलप, सौ.मनिषा सिनगारे आदि सर्वांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे दिमाखदार सुंदर नियोजन शाळेचे संचालक श्री.प्रविण रावते यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या सौ.प्रिया रावते यांनी करून कार्यक्रमाला उपस्थितांचे त्यांनी आभार मानले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *