जिला

विधी महाविद्यालयात ग्रंथालय व माहितीशास्त्र शिक्षणक्रमाचे शिबीर संपन्न

 

नांदेड:- उध्दव सरोदे – येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक अंतर्गत ग्रंथालय व माहितीशास्त्र शिक्षणक्रमाचे अनिवासी अभ्यास शिबीर महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा केंद्रप्रमुख डॉ.व्ही.व्ही.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ.एस.एल.जाधव उपप्राचार्य,स्वामी विवेकानंद महाविद्यालय,उदगीर आणि प्रा.डॉ.आर.बी.टेकाळे ग्रंथपाल, श्री.शिवाजी महाविद्यालय,परभणी तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. परमेश्वर इंगळे ग्रंथपाल,महात्मा फुले महाविद्यालय,अहमदपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.सुरुवातीला ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले.उपस्थित तज्ञ मार्गदर्शक प्रा.डॉ.एस.एल.जाधव यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाबद्दल सखोल व सविस्तर मार्गदर्शन करीत संशोधन आराखडा,संशोधन अहवाल लेखन आणि ग्रंथालय व्यवस्थापणा मध्ये संशोधनाचे महत्व याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले.

प्रा.डॉ.आर.बी.टेकाळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयात करिअर करण्यासाठी सुवर्णसंधी आहे तरी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून यशस्वी व्हावे असे आवाहन केले. यावेळी उपस्थित असलेले प्रा. परमेश्वर इंगळे यांनी ग्रंथालयातील संशोधन पद्धती विषयी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. अशा प्रकारे उद्घाटन प्रसंगी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यापीठाची शिबीरामागील भूमिका स्पष्ट करत शोधनिबंध व प्रकल्प ठेवण्या मागच्या उद्दिष्टांचा मागोवा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन केंद्र संयोजक प्रा.डॉ.राजीव वाघमारे यांनी केले.

यावेळी त्यांनी एम.लिब. आय.एस.अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती दिली व सदरील शिबीराच्या माध्यमातुन विद्यार्थी,संमंत्रक आणि विषयतज्ज्ञ यांच्या मध्ये संबंधीत विषयातील अद्ययावत माहितीची चर्चा घडून आणणे,विद्यार्थांच्या प्रकल्प संशोधनास मान्यता देणे हा उदेश असल्याचे सांगितले.यावेळी प्रस्तुत नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,प्रशिक्षणार्थी आदी उपस्थित होते.सायंकाळच्या सत्रामध्ये डॉ.चरणजीतसिंघ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली समारोपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

या शिबिर समारोप प्रसंगी बोलतांना डॉ. चरणजीतसिंघ महाजन यांनी विद्यार्थ्यांनी संशोधन काळजीपूर्वक करून संशोधन दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करा असे आव्हान केले.यावेळी कार्यालयीन अधिक्षक श्री.पी.जी.शिंदे,श्री.एस.के. लोंढे उपस्थित होते.या दोन दिवशीय शिबीरात विद्यार्थ्यांनी आपले शोध निबंध व प्रकल्प आराखडा सादर केला.विद्यार्थ्यांच्या वतीने घोलप सुदर्शन,गुंडे अवधूत,गुंजकर राजू व इतर प्रशिक्षणार्थीनी आपली समाधानकारक मनोगते व्यक्त केली. केंद्र संयोजक प्रा.डॉ.राजीव वाघमारे यांनी अभार मानले. यावेळी शिबीरार्थी विद्यार्थी/विद्यार्थीनी उपस्थित होते.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.मोरे माधव, श्री.शिंदे एम.बी.श्री.रोकडे,श्री.शेषन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *