मराठवाडा

संविधान समर्थक समाज जोडो अभियान व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कार्यकारिणीची पुर्नगठन निवड प्रक्रिया बैठक संपन्न..

अर्धापूर:- उध्दव सरोदे – अर्धापूर शहरातील चेतना बुद्ध विहार सावतामाळी नगर येथे ता.३१ भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर आयोजीत संविधान समर्थक समाज जोडो अभियान व तालुका शाखा पुर्नगठन निवड प्रक्रिया बैठक संपन्न झाली.या निवड प्रक्रीयेत आयु.दामोधर सरकटे(जिल्हा सरचिटणीस)आयु.सुभाष नरवाडे (जिल्हा कोषाध्यक्ष)आयु.कृष्णा गजभारे(जिल्हा संस्कार सचीव तथा डि.ओ.एस.एस.डी) आदी समीतीने पुर्नगठन निवड प्रक्रीया पार पाडुन खालील प्रमाणे कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून यामध्ये अर्धापूर तालुकाध्यक्ष-विलास सटवाजी लोणे,सरचिटणीस-भुजंग विठोबा लोणे,कोषाध्यक्ष-केशव नारायण शिरसाट,संस्कार उपाध्यक्ष- अॅड.गौरव उद्धवराव सरोदे,

उपाध्यक्ष पर्यटन/प्रसार-रामजी नरसाजी लोणे, उपाध्यक्ष संरक्षण-भीमराव कचरू सावते,कार्यालयीन सचिव-प्रकाश दत्ता लोणे,हिशोब तपासणीस- ब्रम्हाजी तुकाराम सावते,संस्कार सचिव-गौरवनाथ लालू आठवले, संस्कार सचिव-रवी विलास एंगडे, पर्यटन/प्रसार सचिव-सुनील सटवाजी लोणे,पर्यटन/प्रसार सचिव-विनोद सुदाम शिरसाठ,संरक्षण सचिव- सुनील भीमराव भगत,संरक्षण सचिव-माधव मारुती मोरे,संघटक- विशाल दिलीप नरवाडे,संघटक- धीरज गोवंदे,आदित्य लोणे,अविनाश झोडगे,सुरेंद्र रामजी सरोदे तसेच बुद्ध विहार व्यवस्थापक-जयशिला काशिनाथ सरोदे,ताईबाई मोतीराम जोगदंड आदि वरील प्रमाणे कार्यकार णीची निवड करण्यात आलेली असून नुतन कार्यकारिणीचे हार्दीक अभिनंदन करून पुढिल धम्म कार्यास हार्दीक शुभेच्छा दिल्या.

यावेळी सर्व प्रथम महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प,दिप, धुपने पूजन करून अभिवादन करून सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात येवून मागील कार्यकारिणी ने केलेल्या कामाचा अहवाल आयु.विजय गव्हाणे मा.सरचिटणीस ता.अर्धापूर यांनी सादर केला तसेच २ वर्षातील लेखा जोखा अहवाल आयु.एच.व्ही.मोरे मा.तालुका अध्यक्ष अर्धापूर यांनी सभागृहास दिला.निवड प्रक्रियेचे सुत्रे आयु.दामोधर सरकटे सर,जिल्हा सरचिटणीस यांनी आपल्याकडे घेऊन संस्थेच्या कामकाजाची व इतर महत्त्वपूर्ण माहिती सांगितली.

याप्रसंगी आयुष्यमान सुभाष नरवाडे सर जिल्हा कोषाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले तसेच आयुष्यमान कृष्णा गजभारे,संस्कार सचिव उर्फ डी.ओ एस.एस.डी),आयु.आनंद झडते, जिल्हा संरक्षण सचिव यांनी समता सैनिक दल या विभागाची माहिती सांगितली व नुतन कार्यकारिणीची घोषणा आयुष्यमान दामोधर सरकटे सर यांनी केले असुन नुतन कार्यकारिणीने संस्थेच्या नियमाप्रमाणे काम करावे अशा सूचना दिल्या.या प्रसंगी आयु.भीमराव सावते,सैनिक स.सै.द.रामजी लोणे व तालुक्यातील मान्यवर उपासक,उपासीका उपस्थित होते.

सर्व नुतन पदाधिकारी यांना जिल्हा शाखा नांदेड उत्तरचे पदाधिकारी यांच्या तर्फे हार्दीक शुभेच्छा आयु.सरकटे सर यांनी नुतन कार्यकारनीने संस्थेच्या नियमाप्रमाणे काम करून धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा व्यक्त करून ते जिल्हा कार्यकारिणीला सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करून पुनश्च सदरील नुतन कार्यकारणीस शुभेच्छा देवून ही बैठक व निवड दिमाखदार पणे,नियोजनबद्ध रित्या संपन्न झाली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *