राजीव गांधी महाविद्यालयांमध्ये मृदा परीक्षण कार्यशाळा संपन्न

अर्धापूर:- उध्दव सरोदे – श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि भूगोल विभागाच्या वतीने मृदा परीक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेची सुरुवात डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमा पूजनाने करून कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.टी.शिंदे होते तर साधन व्यक्ती म्हणून इंदिरा गांधी महाविद्यालयातील प्रा.डॉ.भागवत पस्तापुरे हे होते.
या वेळी व्यासपीठावर प्रा.डॉ.शशिकांत तोळमारे,प्रा.डॉ.नामदेव वाघमारे,प्रा. डॉ.आर.बी.कोटलवार होते.प्रा.डॉ. पस्तापुरे यांनी आपल्या मार्गदर्शनात विध्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की,आजच्या काळात माती परीक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे बहुतेक शेतकरी मृदेचे परीक्षण करत नाहीत त्यामुळेच कृषी मध्ये कोणते पिके घ्यावे याबद्दल माहिती नसते.अलीकडच्या काळात हवा प्रदूषण,जल प्रदूषण,ध्वनी प्रदूषण अशा समस्या आहेत तशीच मृदा प्रदूषित झाली आहे.शेतकरी अनाधुंदपणे विविध रासायनिक खते वापरतात,आपल्या मृदेला नेमकी कोणत्या खतांची आवश्यकता आहे.
याबद्दलचे पुरेसे ज्ञान जन माणसात व शेतकऱ्यात नसते.तेव्हा भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी माती परीक्षण कौशल्य आत्मसात केली तर निश्चितपणे स्वतःबरोबर शेतकऱ्याला याचा फायदा होणार आहे.यावेळी प्रा.डॉ. तोळमारे यांनी मृदा संवर्धन यावर सविस्तर माहिती दिली आणि प्रा.डॉ. नामदेव वाघमारे यांनी मानवी जीवनातील मृदेचे महत्त्व या अनुषंगाने सविस्तर माहिती सांगितली.अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ.शिंदे यांनी भूगोल हा विषय अतिशय महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी मृदा परीक्षणाचे कौशल्य आत्मसात केलं तर स्वतःचा रोजगार उभा करू शकतो असे प्रतिपादन केले.
या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वय प्रा.डॉ. आर.बी.कोटलवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. मारोती देशमुख यांनी करून आभार प्रा.बालाजी जाधव यांनी मानले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील भूगोल विषयाचे विद्यार्थी,प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्री.ए.एल.डोंगरे,डी.सी इंगोले,मुकुंद डांगे,डि.के.डहाळे आदिंनी मेहनत घेतली.



