शिक्षण

महात्मा फुले हायस्कूलच्या एनसीसी एअर विंगची दैदिप्यमान कामगिरी; मेन ड्रिलमध्ये प्रथम क्रमांक, दत्ता बारसे यांना फर्स्ट ऑफिसर पदोन्नती

नांदेड, १५- महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर, नांदेड येथील 3 MAH AIR SQN NCC, Pune अंतर्गत कार्यरत एनसीसी एअर विंग विभागाने सी.ए.टी.सी.-७१६ (Combined Annual Training Camp-2026) मध्ये दुहेरी यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दि. ५ ते १४ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित या शिबिरात महाराष्ट्रातील ११ शाळांच्या एनसीसी पथकांनी सहभाग घेतला होता.

शिबिरातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मेन ड्रिल स्पर्धेत महात्मा फुले हायस्कूलच्या कॅडेट्सनी उत्कृष्ट शिस्त, अचूक संचलन आणि प्रभावी समन्वयाचे दर्शन घडवत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे शाळेसह नांदेड जिल्हा आणि 3 MAH AIR SQN NCC, Pune युनिटच्या नावलौकिकात भर पडली आहे.

या यशामागे एनसीसी एअर विंगचे ए.एन.ओ. दत्ता बारसे यांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि विद्यार्थ्यांवर केलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन हे प्रमुख कारण ठरले. गेल्या बारा वर्षांपासून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, देशभक्ती आणि सेवाभावाची मूल्ये रुजवत अनेक कॅडेट्सना राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवून दिले आहे.

याच शिबिरादरम्यान त्यांच्या उत्कृष्ट सेवाकार्याची दखल घेत सेकंड ऑफिसर पदावरून ‘फर्स्ट ऑफिसर’ या उच्च पदावर त्यांची पदोन्नती जाहीर करण्यात आली. 3 MAH AIR SQN NCC, Pune चे कमांडिंग ऑफिसर विंग कमांडर एस. एस. मराठे आणि विंग कमांडर अर्पण चंदा यांच्या हस्ते त्यांना पदोन्नतीचे चिन्ह प्रदान करण्यात आले.

फर्स्ट ऑफिसर दत्ता बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कॅडेट्सनी विविध प्रशिक्षण शिबिरे, सामाजिक उपक्रम आणि राष्ट्रीय स्तरावरील एनसीसी स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, नेतृत्वगुणांच्या संवर्धनासाठी आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते.

महात्मा फुले हायस्कूलच्या एनसीसी एअर विंगची ही दुहेरी कामगिरी संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली असून, भविष्यातही या विभागाकडून अशीच उज्ज्वल कामगिरी घडत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
फर्स्ट ऑफिसर दत्ता बारसे यांना पदोन्नतीबद्दल तसेच मेन ड्रिल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या सर्व कॅडेट्स व प्रशिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, उपाध्यक्ष अमिता चव्हाण, सचिव डी. पी. सावंत, सहसचिव डॉ. रावसाहेब शिंदारकर, कोशाध्यक्ष उद्धवराव निंबाळकर, कार्यकारी सदस्य श्रीजया चव्हाण व नरेंद्र चव्हाण, महात्मा फुले हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम, उपमुख्याध्यापक अण्णा गरड तसेच विविध स्तरांतील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *