जिला

शंकरराव धनजकर गुरुजी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

 

देगलूर- ज्येष्ठ शिक्षक व समाजसेवक शंकरराव नागोराव धनजकर (गुरुजी) यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी नागार्जुन बौद्ध विहार, देगलूर येथे भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी धनजकर कुटुंबीयांच्या वतीने विहारासाठी ५० खुर्च्यांची भेट देण्यात आली. तसेच उपस्थित बौद्ध भिक्षूंना चिवरदान करण्यात आले. विशाखा महिला मंडळाला सामाजिक व धम्मकार्याकरिता १० हजाराची रोख मदत प्रदान करण्यात आली. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती साजरी करणाऱ्या मंडळास दहा हजाराचा निधी देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धोंडीबाजी कांबळे होते. उपाध्यक्ष सूर्यकांत सोनकांबळे, सचिव लालू सोनकांबळे, तसेच समिती सदस्य व सिद्धार्थ नगरमधील अनेक बौद्ध उपासक-उपासिका यावेळी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये इंजि. भिमराव धनजकर, तहसीलदार सिद्धार्थ धनजकर, इंजि. नरेंद्र धनजकर, डॉ. प्रमोद धनजकर, इंजि. भूषण धनजकर, प्रा. राजू राजूरकर, टी. पी. वाघमारे, मुरलीधर कांबळे, बालाजी अंबुलगेकर, प्रा. उत्तम मोरे, विजय चव्हाण, विजय जोंधळे, बालाजी पोतुलवार, इंजि. धम्मरत्न एडके व हणमंत काटमोडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी इंजि. भिमराव धनजकर यांनी आपल्या वडिलांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचे स्मरण करत, समाजासाठी काहीतरी देणे लागते या जाणिवेतून ही भेट देण्यात आली आहे. भविष्यातही समाजोपयोगी कार्यात आपण सक्रिय राहू,असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिलिंद बिरकंगण यांनी तर उपस्थित आमचे आभार हनुमंत काटमोडे यांनी मानले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *