मराठवाडा

हजूर साहिब गुरुद्वाऱ्यात वैसाखी आणि खालसा साजना दिवस निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम – 14 एप्रिलला महल्ला (हल्लाबोल) यात्रा

 

दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही वैसाखी – खालसा पंथ साजना दिवस च्या उपलक्ष मध्ये तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम परंपरागत पध्दतीने हर्षोल्लासाने संपन्न होणार आहेत. यावेळी दि. 13/04/2025 रोजी सकाळी जवळपास 12:00 वाजता आदरणिय पंजप्यारे साहिबान तर्फे अमृत तैयार करुन इच्छुक अनुयायांना वैसाखी – खालसा पंथ साजना दिवस च्या दिवशी अमृतपान करुन अनुयायांना दिक्षा (अमृत ची दाद) देण्यात येईल तसेच परंपरागत पध्दतीने विविध धार्मिक कार्यक्रम, पुजा-पाठ इत्यादी केली जाईल.

तसेच या दिवशी रात्री वैसाखी खालसा पंथ साजना दिवसाच्या उपलक्षात माननिय संत बाबा कुलवंत सिंघ जी जत्थेदार साहिब व पंजप्यारे साहिबान यांच्या सरप्रस्तीमध्ये व गुरुद्वारा बोर्डाच्या सहकार्याने तसेच दशमेश हजूरी सेवा सोसायटी, श्री हजूर साहिब, नांदेड यांच्या वतीने रात्री 08:30 ते 12:30 पर्यंत 15वां विशेष किर्तन दरबार चे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये पंथ प्रसिध्द किर्तनकार रागी भाई सुखप्रीत सिंघ जी व भाई गुरबचन सिंघ जी – दोन्ही हजूरी रागी श्री दरबार साहिब अमृतसर हे गुरुबाणी, किर्तन करुन भाविकांना निहाल करतील.

दि. 14/04/2025 रोजी वैसाखी सणा निमित्त परंपरागत महल्ला (हल्लाबोल) कार्यक्रम धार्मिक नगर किर्तन सायंकाळी 04:00 वाजता तख्त साहिब येथून अरदास करुन आदरणिय सिंघ साहिब संत बाबा कुलवंत सिंघ जी – जत्थेदार व माननिय पंजप्यारे साहिबान यांच्या सरप्रस्ती मध्ये आरंभ होऊन परंपरागत मार्गाने धार्मिक प्रवचन, किर्तन, भजन, नाम सिमरण करत हल्लाबोल चौक (फॉरेस्ट ऑफिस) येथे पोहचुन परंपरागत हल्लाबोल कार्यक्रम होईल तत्पश्चात हा महल्ला गुरुद्वारा बाऊली साहिब येथे पोहचुन व अल्प विश्रांती घेऊन परंपरागत मार्गांनी गुरुद्वारा नगीनाघाट साहिब येथे पोहचेल आणि रात्री 10 ते 10:30 पर्यंत तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब येथे पोहचुन समापन होईल.

तरी सर्व भाविकांना विनंती आहे की या सर्व कार्यक्रमां मध्ये उपस्थित राहून गुरु महाराजांचे आशिर्वाद प्राप्त करावेत.

अधिक्षक
गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *