जिला

बिलोली शहरात 22 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

 

नांदेड (दि. 13 एप्रिल) :- जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने शुक्रवार 11 एप्रिल रोजी बिलोली शहरात अचानक धाडी टाकून 22 तंबाखू विक्रेत्यांकडून 10 हजार 700 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बिलोली शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, दंत शल्य चिकित्सक डॉ पूजा काळे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, समुपदेशक दिनेश तळणे तसेच केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे मंगेश गायकवाड तसेच बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्सटेबल ए.एस.अचेवाड व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते…

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *