जिला

लोहा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

लोहा (१४ एप्रिल २०२५) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, समता, बंधुता आणि न्यायाचे प्रतीक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोहा येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला माजी आमदार रोहीदास चव्हाण, शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष मधूकर पाटील दिघे, माजी नगरसेवक शिवाजी आंबेकर, उत्तम महाबळे, चंद्रकांत पाटील नळगे, भिमराव शिंदे, मलिकार्जुन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. डॉ. आंबेडकरांनी समाजासाठी केलेल्या कार्याचे स्मरण करत त्यांचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी अभिवादनाची भावना असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. छायाचित्र – विनोद महाबळे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *