क्राईम

वसंतराव नाईक चौकात तिर्रट जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

 

नांदेड, १३ एप्रिल २०२५ : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतराव नाईक चौकाजवळ नागार्जुना हॉटेल परिसरात विना परवाना सुरू असलेल्या तिर्रट नावाच्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत रोख १८,५२० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी मधुकर निळकंठ बोरसे (वय ५८, रा. आनंदनगर, नांदेड) आणि इतर आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ४, ५ म. जु. कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मारोती गायकवाड यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत. जुगारावर निर्बंध आणण्यासाठी व अशा बेकायदेशीर क्रियाकलापांना आळा बसावा यासाठी ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *