क्राईम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अवैध दारू विक्रीवर छापा, देशी व विदेशी दारू साठा जप्त

 

नांदेड, १४ एप्रिल २०२५ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नांदेड शहर व परिसरात अवैधरित्या देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींवर स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार कारवाई केली. या कारवाईत एकूण ४७,६००/- रुपयांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला असून, एक आरोपीस अटक करण्यात आली आहे.

या विशेष मोहिमेचे मार्गदर्शन मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, तसेच मा. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर यांनी केले.

मुख्य शंकर चंद्रकांत बुक्तरे (वय २४ वर्षे), व्यवसाय – बेकार, रा. कल्याणनगर, कॅनॉल रोड, नांदेड. याचा कडून देशी दारू (भिंगरी संत्रा) – ३८४ बाटल्या, दारू: MCDOWELL’S NO.1 – ४५ बाटल्या, ROYAL STAG – ४५ बाटल्या, एकूण मुद्देमालाची अंदाजे किंमत: ४२,६३०/- रूपाचे माल जप्त करण्यात आले 

दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी, कल्याणनगर, कॅनॉल रोड, नांदेड येथे शंकर बुक्तरे याच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. गुप्त माहितीनंतर पोलिसांनी धाडसत्र राबवत वरील प्रमाणात दारू जप्त केली आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात मुद्देमाल व आरोपी देण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने नांदेड शहरात इतर तीन ठिकाणीही धाडी टाकत ४,९७०/- रुपयांचा अवैध दारू साठा जप्त केला आहे.  उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. नांदेड, आर. व्ही. वाहुळे, सहायक पोलीस निरीक्षक, पोउपनि दासरे, सपौ. गुंडेराव करले, पोकॉ. देविदास चव्हाण, पोकॉ. मोतीराम पवार, पोकॉ. इसराईल, पोहेकॉ. मिलिंद नरबाग, चालक पोकॉ. देवकत्ते, मपोकॉ. महेजबीन शेख

या धडक मोहिमेमुळे जयंतीनिमित्त संभाव्य गैरप्रकारांना आळा बसला असून, पोलिस अधीक्षकांनी सदर कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि अंमलदारांचे कौतुक केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दाखवलेली तत्परता व शिस्तबद्ध कारवाई ही गुन्हेगारीवर रोख आणण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *