जिला

प्रिपेड वद्युत मीटर विरोधात काँग्रेसचा यलगार महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन

लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा

 

मुदखेड :- महावितरण कंपनीच्या वतीने शहरात बसविण्यात येत असलेल्या प्रिपेड विद्युत मीटर विरोधात शहर तसेच युवक काँग्रेसच्या वतीने यलगार पुकारण्यात आला आहे. महावितरण कंपनीच्या अधिकारायांना निवेदन देऊन तातडीने स्मार्ट मीटर बसविणे थांबविण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नांना उत्तर देताना राज्यात महावितरण कंपनीच्या माध्यमातून बसविण्यात येणारे मीटर थांबविण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले होते. परंतु संबंधित विभाग आदेशाचे व सूचनाचे पालन करत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याविरोधात शहर व युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

महावितरण कंपनीने शहरात प्रेपेड मीटर बसविण्याचा प्रयत्न केला तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल या आशयाचे लेखी निवेदन महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता ल लक्ष्मीन शिंदे तसेच सहाय्यक अभियंता यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर काँग्रेस शहराध्यक्षय कैलास गोडसे, माजी नगराध्यक्षय राज बहादूर कोतावर, माजी उपनगर अध्यक्ष करीम खान साब, काँग्रेस कॉमेटी चे जिल्हा सचिव गिरीश कोतावर, जिल्हा उपाध्यक्ष राजू चौदंते,

कार्याध्यक्ष मोहमद गौस, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष तौफिक पठाण, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब पठाण, उपाध्यक्ष दादाराव पुयड नागेलीकर, सरपंच प्रतिनिधी साहेबराव गोरखवाड, अनुसूचित जाती शहराध्यक्ष ऋषिकेश चौदंते, अल्पसंख्याक शहराध्यक्ष इक्बाल कुरेशी, युवक काँग्रेस सचिव अतिक अहेमद, आकाश सोनटक्के, युवाक काँग्रेस उपाध्यक्ष अविनाश चौदंते, शिवाजी पाटील सूर्यवंशी, सुभाष चौदंते, वेदांत शेवटे, लतीफ टेलर, मल्लेवार यांच्यासह आदिनाच्या स्वाक्षऱ्या आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *