भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत व उत्साहात साजरी……

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अनुषंगाने नांदेड शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या मिरवणुकीसह नांदेड जिल्हयातील एकुण 28 पोलीस स्टेशन हद्दीतुन निघालेल्या एकुण 165 मिरवणुका, 02 मोटार सायकल रॅली व इतर अन्न वाटप, रक्तदान शिबीर, पुस्तक वाटप व सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 14/04/2025 रोजी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता शांतता पुर्ण, आनंदी व उत्साही वातावरणात पार पडले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्ये अंदाजे 70 ते 80 हजार जनसमुदाय मिरवणुकीत व इतर अनुयायी शोभारॅली पाहण्यासाठी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत साजरी व्हावी याकरीता नांदेड जिल्हयातील पोलीस स्टेशन अंतर्गत 400 पेक्षा जास्त प्रतिबंधात्मक कारवाई तसेच 163 बीएनएस अन्वये 460 कारवाई करण्यात आले आहेत. जिल्हयातील 36 पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या. जिल्हयात निघणारे मिरवणुकांच्या पुर्ण मार्गाचे ऑडिट करण्यात आले पोस्टे स्तरावर व उप विभागीय स्तरावर दंगाकाबू नियंत्रण योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. जिल्हयात ठिक-ठिकाणी सर्च आणि चेकींग ऑपरेशन राबवून रेकार्डवरील हिस्ट्रीसिटर डिटेन करण्यात आले. दिनांक 13.04.2025 रोजी मास रेडचे आयोजन करुन जिल्हयात एकुण 101 केसेस करुन 4,51,992/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती अनुषंगाने “मिशन उडान” अंतर्गत सकारात्मक दुष्टीकोनातुन सलग 18 तास अभ्यास हा उपक्रम दिनांक 14.04.2025 रोजी सकाळी 06.00 वा. ते रात्री 12.00 वा. दरम्यान आयोजित करण्यात आला सदर उपक्रमास जनतेने अतिशय चांगला प्रतिसाद दिला यात सर्व वयोगटातील एकुण 250 पेक्षा जास्त विदयार्थी व इतर यांनी सहभाग घेतला होता. जिल्हयात निघणाऱ्या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दिनांक 10.04.2025 रोजी पासुन पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथून संपुर्ण नांदेड शहरात पोलीस दल व राम मनोहर लोहीया प्रतिष्ठान विकास मंडळ नांदेड यांचे संयुक्त विदयमाने जनजागृती अभियान राबविण्यात आले त्यास जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने निघालेल्या मिरवणुका व आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे शांतता पुर्ण व सलोख्याच्या वातावरणात पार पडणे करीता सुरुवातीपासुनच अत्यंत दक्ष राहुन योग्य नियोजन केले. नांदेड पोलीस दलाकडुन एकुण 01 पोलीस अधिक्षक, 02 अपर पोलीस अधिक्षक, 05 उपविभागीय पोलीस अधिकारी, 01 प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक, 150 पोलीस अधिकारी, 1200 पोलीस अंमलदार, 04 दंगल नियंत्रण पथक, 1400 होमगार्ड व 01 SRPF कंपनी असा बंदोबस्त संपूर्ण नांदेड जिल्हयात तैनात करण्यात आला होता.
तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कालावधी दरम्यान मिरवणुकीतील कायदयाचे उल्लंघन करणारे डिजे चालक व मालक यांचेवर कारवाई करण्यात आली. वरील प्रमाणे करण्यात आलेल्या उपाय योजनांमुळे तसेच नांदेड जिल्हयातील सुजान नागरिक, जयंती मंडळाचे अध्यक्ष, अनुयायी व जनता यांचे सहकार्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कालावधीत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसुन संपुर्ण उत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने निघालेल्या मिरवणुका तसेच आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम शांततेत पार पडले. नांदेड जिल्हयातील सर्व सुजान नागरिक, जयंती मंडळाचे अध्यक्ष, अनुयायी व जनता यांनी केलेल्या सहकार्याबद्दल नांदेड पोलीस प्रशासनाव्दारे सर्वांचे अभिनंदन करुन आभार मानन्यात आले आहेत.



