जिला

पिंपळगाव येवला येथील दृष्यमान स्वच्छता उपक्रमांची पाहणी

उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी साधला ग्रामस्‍थांशी संवाद

नांदेड,16- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छ गावासाठी लोहा तालुक्यातील पिंपळगाव येवला येथे प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी आज दिनांक १६ एप्रिल रोजी गावास भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी गावात राबविण्यात येत असलेल्या दृष्यमान स्वच्छता’ उपक्रमांची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. या प्रसंगी सरपंच तुळसाबाई गोरे, उपसरपंच राजेश तोंडचिरे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ मिलिंद व्यवहारे, तालुका गट समन्वयक प्रेमचंद कदम, ग्राम विकास अधिकारी या चिवडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

गाव फेरी दरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी वैयक्तिक शौचालये, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शोषखड्डे, 15 व्‍या वित्‍त आयोगात पाणी व स्‍वच्‍छता विषयावर ठेवण्‍यात आलेला आरखडा आदींबाबत सविस्तर आढावा घेतला. त्यांनी आवश्यक सुधारणा ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिल्या व तत्काळ पूर्तीसाठी निर्देशित केले. विशेषतः त्यांनी पाणी तपासणी किटच्या वापराबाबत माहिती देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. सुरक्षित व स्वच्छ पाण्याचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, स्वच्छता ही केवळ दिसणारी नसून अनुभवासही येणारी असावी, तेव्हाच ती खरी दृष्यमान स्वच्छता’ ठरेल, असेही ते म्‍हणाले. यावेळी तंटा मुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग तोंडचिरे,
मुरलीधर येवले, प्रल्हाद येवले, दशरथ येवले, सिताराम येवले, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

नांदेड,16- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छ गावासाठी लोहा तालुक्यातील पिंपळगाव येवला येथे प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी आज दिनांक १६ एप्रिल रोजी गावास भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी गावात राबविण्यात येत असलेल्या दृष्यमान स्वच्छता’ उपक्रमांची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. या प्रसंगी सरपंच तुळसाबाई गोरे, उपसरपंच राजेश तोंडचिरे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ मिलिंद व्यवहारे, तालुका गट समन्वयक प्रेमचंद कदम, ग्राम विकास अधिकारी या चिवडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

गाव फेरी दरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी वैयक्तिक शौचालये, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शोषखड्डे, 15 व्‍या वित्‍त आयोगात पाणी व स्‍वच्‍छता विषयावर ठेवण्‍यात आलेला आरखडा आदींबाबत सविस्तर आढावा घेतला. त्यांनी आवश्यक सुधारणा ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिल्या व तत्काळ पूर्तीसाठी निर्देशित केले. विशेषतः त्यांनी पाणी तपासणी किटच्या वापराबाबत माहिती देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. सुरक्षित व स्वच्छ पाण्याचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, स्वच्छता ही केवळ दिसणारी नसून अनुभवासही येणारी असावी, तेव्हाच ती खरी दृष्यमान स्वच्छता’ ठरेल, असेही ते म्‍हणाले. यावेळी तंटा मुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग तोंडचिरे, मुरलीधर येवले, प्रल्हाद येवले, दशरथ येवले, सिताराम येवले, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *