जिला

शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

लोहा. (ता.१६): शिक्षक सेनेचे राज्यध्यक्ष व विद्यमान शिक्षक आमदार मा. ज. मो. अभ्यंकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा तालुक्यातील अनाथ निवासी मुलांचे वसतीगृह येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी सतिश व्यवहारे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठुभाऊ चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी बाबुराव फसमल्ले, केंद्र प्रमुख व जिल्हाध्यक्ष संतोष आंबुलगेकर, तालुकाध्यक्ष संभाजी पवार, केद्रप्रमुख दत्तात्रय मोहिते, वस्तीगृह अधीक्षक शेख सर, तसेच बी. जी. वाघमारे, संभाजी केंद्रे, काशिनाथ शिरसीकर, लहू पंदलवाड, आर. जी. वाघमारे, वामन पवार, विजय तेललवार, बंडोपंत स्वामी, नागेश्वर स्वामी, दशरथ मेकाले, शिवराज सोनवळे, मारोतराव चव्हाण, सुभाष राठोड, कातुरे सर, आकोले सर, बाळू चव्हाण सर यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक बांधव व विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत शिक्षक सेनेने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा उपक्रम उपस्थित मान्यवरांनी स्तुत्य असल्याचे नमूद केले. छायाचित्र : विनोद महाबळे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *