जिला

त्रकार अॅड.गौरव सरोदे यांचा पुस्तक भेट देवून केला सन्मान

अर्धापूरच्या ईद मिलाप कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा.सय्यद सलमान यांच्या हस्ते सत्कार

 

 

अर्धापूर:- उध्दव सरोदे – दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ता.१३ एप्रिल रोजी रमजान ईदच्या अनुषंगाने जमाअत ए इस्लामी हिंद अर्धापूर तालूक्याच्या वतीने ईद मिलाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा.सय्यद सलमान सर (पुसद) हे होते. पत्रकार अॅड.गौरव उध्दवराव सरोदे यांनी रमजान ईदच्या काही महिन्यांपूर्वी ” इस्लाम धर्म व मुहम्मद पैगंबर” या विषयावर लेख(आर्टिकल) लिहिल्याने सदरचे लेख(आर्टिकल) हे विविध वर्तमानपत्रात व सोशल मिडियातील व्हाट्सअप, फेसबुक, मेसेनजर, इन्स्टाग्रामवर, ट्विटर आदि मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या लेख (आर्टिकल)

ची सत्यता व महत्त्व वाचून त्याची बऱ्याच व्यक्तिंनी दखल घेवून अॅड.गौरव सरोदे यांचा बऱ्याच ठिकाणी सत्कार व सन्मान करून अभिनंदन करण्यात आले.अशाच प्रकारचा सत्कार व सन्मान ईद मिलापच्या कार्यक्रमात सर्व मानव जाती धर्मातील प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रमुख वक्ते प्रा.सय्यद सलमान सर (पुसद) यांनी पत्रकार अॅड.गौरव उध्दवराव सरोदे यांनी लिहिलेल्या लेख (आर्टिकल) बद्दल त्यांना पैगंबर मुहम्मदान सर्वांसाठी हे पुस्तक भेट देवून त्यांचा सत्कार व सन्मान करून अभिनंदन केले.

यावेळी उपस्थित जमाअत ए इस्लामी हिंदचे अर्धापूर तालुकाध्यक्ष अब्दुल्ला खान,मुजफ्फर खान,शेख रफीक, सुलेमान खान,अफरोज खान,परवेझ खतीब,जावीद चौधरी, शाकेर खान,अफसर कुरेशी व ईतर हिंदू व मुस्लिम धर्मातील सर्व मान्यवर उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *