अमरावती-तिरुपती–अमरावती एक्स्प्रेस काही दिवस रद्द करण्यात आल्या बाबत
तिरुपती-अकोला-तिरुपती विशेष गाडी काही दिवस मार्ग बदलून धावणार

गुंटकल विभागातील धर्मावरम स्थानकावर यार्ड परिवर्तन चे कार्य करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. या मुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यातील नांदेड विभागातून धावणारी अमरावती-तिरुपती–अमरावती एक्स्प्रेस काही दिवस रद्द करण्यात आली आहे. ती पुढील प्रमाणे –
रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
1. गाडी संख्या 12766 अमरावती – तिरुपती एक्स्प्रेस दिनांक 05, 08, 12 आणि 15 मे, 2025 रोजी रद्द करण्यात आली आहे.
2. गाडी संख्या 12765 तिरुपती – अमरावती एक्स्प्रेस दिनांक 06, 10, 13 आणि 17 मे, 2025 रोजी रद्द करण्यात आली आहे.
मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या :
1. गाडी क्रमांक 07606 अकोला ते तिरुपती विशेष गाडी दिनांक 04 आणि 11 मे, 2025 रोजी गुत्ती, रेनुगुंठा आणि तिरुपती मार्गे वळविण्यात आली आहे.
2. गाडी क्रमांक 07605 तिरुपती ते अकोला विशेष गाडी दिनांक 09 आणि 16 मे, 2025 रोजी तिरुपती, रेनुगुंठा आणि गुत्ती मार्गे वळविण्यात आली आहे.



