जिला

अर्धापूरात राज्यस्तरीय बोधिसत्व धम्म ज्ञान परिक्षा संपन्न

 

अर्धापूर:- उध्दव सरोदे – भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य शाखेच्या आदेश व परवानगीने भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर, तालुका शाखा नांदेड उत्तर व शहर शाखा नांदेड उत्तर संयुक्त विद्यमाने व आदेशाने शहरातील सुमेध बोधिसत्व बुद्ध विहार समता नगर येथील केंद्रात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय बोधिसत्व धम्म ज्ञान परिक्षा पर्यवेक्षक भारतीय बौद्ध महासभेचे अर्धापूर तालूका संस्कार उपाध्यक्ष अॅड. गौरव उध्दवराव सरोदे व निरिक्षक कोषाध्यक्ष केशव नारायण सिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये घेण्यात आली.

सर्वप्रथम सर्व उपस्थितांनी तथागत भगवान गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पुष्प, दिप, धुपाने पुजन करून अभिवादन केले. सदरची परिक्षा ही ठरलेल्या वेळात सुरू होवून यामध्ये ५ वी ते ७ वी वर्ग पहिला गट, ८ वी ते १० वी वर्ग दुसरा गट व ११ वी ते १२ वी वर्ग तिसरा गट याप्रमाणे परिक्षेत एकूण १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.अत्यंत कमी वेळेत पर्यवेक्षक व निरिक्षक यांनी या कार्यक्रमाचे तयारी पूर्वक शिस्तबद्ध नियोजन लावून सदरची परिक्षा यशस्वीरित्या संपन्न केली. या परिक्षेचे नियोजन लावून परिक्षा यशस्वी करण्यासाठी उपा.विनोद सिरसाठ, उपा.अक्षय कांबळे,उपा.अमोल ठेंगे, उपा.नागेंन्द्र जोंधळे व ईतर बौद्ध उपासक, उपासिका बालक बालिका यांनी परिश्रम घेतले .

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *