क्राईम

देगलुर पोलिसांची मोठी कारवाई : अवैध दारू विक्रीसाठी ठेवलेला साठा जप्त

देगलुर (जि. नांदेड) – नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथे पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर अवैध दारू साठा जप्त करून कारवाई केली आहे. किराणा दुकानात विक्रीसाठी साठवून ठेवलेली देशी आणि विदेशी दारू तसेच बिअर असा एकूण ₹39,920/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. श्री. अबिनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या आदेशावरून “ऑपरेशन फ्लश आउट” अंतर्गत करण्यात आली.

पोलीस निरीक्षक श्री. मारोती श्रीराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली देगलुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे वन्नाळी येथे छापा टाकला. शारदाबाई भुमा कोरेवार (वय ३५ वर्षे, व्यवसाय – किराणा दुकान, रा. वन्नाळी, ता. देगलुर) यांनी त्यांच्या दुकानात अवैधरीत्या दारूचा साठा करून ठेवला होता.

जप्त केलेला माल:

देशी दारू (भिंगरी संत्रा) – 251 बाटल्या – ₹17,570, McDowell’s No.1 – 55 बाटल्या – ₹8,800, Royal Stag Deluxe Whisky – 60 बाटल्या – ₹11,400, Tuborg Premium Beer – 6 बाटल्या – ₹1,200, Kingfisher Strong Premium – 5 बाटल्या – ₹950, एकूण किंमत: ₹39,920/-

 खंडेराव धरणे (अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर), सुरज गुरव (अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड), संकेत गोसावी (उपविभागीय पोलीस अधिकारी, देगलुर), पो.नि. मारोती मुंडे आणि पथकातील अंमलदार – कृष्णा तलवारे, साहेबराव सगरोळीकर, वैजनाथ मोटरगे, सुधाकर मलदोडे, राजवंतसिंह बुंगई, रणजित मुदीराज, अहमद बेग (चालक), जावेद शेख, चंद्रकला कांबळे

या कारवाईमुळे देगलुर परिसरात अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कार्यवाहीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *