बिलोली पोलीसांची तत्पर कारवाई : काही तासांतच खुनाचा गुन्हा उघडकीस

बिलोली (जि. नांदेड) – बिलोली पोलीसांनी अवघ्या काही तासांत खुनाचा गुन्हा उघड करत संशयित आरोपीस अटक केली असून, पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार (IPS) यांनी कौतुक केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने बिलोली येथे लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना रात्री 11 च्या सुमारास नागेश प्रल्हाद लाखे (वय 30) रा. आंबेडकर नगर, बिलोली याने पोलीसांना माहिती दिली की त्याचा मोठा भाऊ सुनिल प्रल्हाद लाखे (वय 34) याचा अज्ञात व्यक्तीने खून केला आहे.
माहिती मिळताच पोउपनि श्री. शिवराज लोखंडे यांनी वरिष्ठ अधिकारी पोनि श्री अतुल भोसले यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
तपास दरम्यान, गल्लीतील स्थानिकांकडून कळले की मयत व आरोपी या दोघा भावांमध्ये संपत्तीच्या कारणावरून सतत वाद होत होते. त्याचप्रमाणे मयताने आरोपीच्या पत्नीस अश्लील शिवीगाळ केली होती. या रागातूनच आरोपीने भाऊ सुनिल लाखे याचा खून केला, अशी कबुली आरोपीने चौकशीत दिली.
तपास करणारे अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक. भोकर, सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड, संकेत गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी, बिलोली, पोनि श्री अतुल भोसले, बिलोली, सपोनि श्रीमती कमल शिंदे, पोउपनि श्री शिवराज लोखंडे, पोलीस अंमलदार – मारोती मुद्देमवार, आनंद शिंदे, व्यंकटी घोंगडे, लक्ष्मण बच्छेवार, सुरेश वनशेट्टे
मयताचे कोणतेही नातेवाईक तक्रार करण्यास पुढे न आल्याने, उश्री शिवराज लोखंडे (पोपनि) यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली असून, सदर खुनाचा तपास सपोनि श्रीमती कमल शिंदे करीत आहेत.
बिलोली पोलीसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला अटक करून दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमतेमुळे परिसरात पोलीस दलाबद्दल विश्वास वाढला आहे.



