क्राईम

वजीराबाद पोलीस ठाण्यातील चोरीचा गुन्हा उघडकीस ट्रॅक्टर जप्त

नांदेड, 18 एप्रिल 2025: वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलेला ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या विशेष पथकाने अवघ्या काही तासांत उघडकीस आणत तब्बल ₹2,10,000 किंमतीचा ट्रॅक्टर जप्त केला आहे.

ही कारवाई “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत करण्यात आली असून, या यशस्वी कारवाईचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार (IPS) यांनी विशेष कौतुक केले आहे.

फिर्यादी मरीबा सयदु मेटकर, वय 45 वर्षे, रा. चिखलवाडी, नांदेड आरोपी भोला पिराजी मेटकर, वय 33, रा. चिखलवाडी, ह.मु. नर्सी, ता. नायगाव, जि. नांदेड महिंद्रा 575 DI ट्रॅक्टर क्रमांक MH 26 BE 1826 अंदाजे किंमत: ₹2,10,000/-

कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार

अबिनाश कुमार – पोलीस अधीक्षक, नांदेड, सुरज गुरव – अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे – अपर पोलीस अधीक्षक, भोकर, उदय खंडेराय – पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. नांदेड,  आर. व्ही. वाहुळे – सहा. पोलीस निरीक्षक, बी.ए. दासरे (पोउपनि), करले (सपोउपनि), देविदास चव्हाण, मोतीराम पवार, इजराईल, मिलींद नरबाग, चालक देवकत्ते सायबर सेल: राजु सिटीकर, दीपक ओढणे

दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी वजीराबाद येथे फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासासाठी स्था.गु.शा. नांदेडच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी भोला मेटकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी गेलेला ट्रॅक्टर MH 26 BE 1826 जप्त करण्यात आला. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.ही जलद व परिणामकारक कारवाई केल्याबद्दल संपूर्ण पथकाचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *