क्राईम

नांदेड ग्रामीण पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी – मोटारसायकल व मोबाईल चोरी करणारे ३ आरोपी जेरबंद,

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे शोध पथकाने चोरीच्या प्रकरणात उल्लेखनीय यश मिळवले आहे. मोटारसायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या ३ आरोपींना अटक करून एकूण १,१६,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई श्री अबिनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड), सुरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक, नांदेड), खंडेराव धरणे (अपर पोलीस अधीक्षक, भोकर) व  सुशीलकुमार नायक (उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

गुन्हा उघडकीस आणणारे अधिकारी व कर्मचारी: ओमकांत चिंचोलकर (पोलीस निरीक्षक, नांदेड ग्रामीण), ज्ञानेश्वर मटवाड (पोलीस उपनिरीक्षक, नांदेड ग्रामीण), पोलीस अंमलदार: पोहेकॉ वसंत केंद्रे, गटलेवार, कऱ्हाळे, पोकों माने, आवळे, पवार, कल्याणकर (गुन्हे शोध पथक)

अटक आरोपींची नावे: यश राजु कांबळे (वय १९) – रा. सावळेश्वर, ता. कंधार, ह.मु. हाडको, नांदेड, तेजेस राजु कांबळे (वय १८) – रा. सावळेश्वर, ह.मु. वडगाव, संभाजीनगर, सोमेश नवनाथ शेरकर (वय १८) – रा. पुर्णा, जि. परभणी, ह.मु. ज्ञानेश्वर नगर, हाडको

जप्त मुद्देमाल: एक टी.व्ही.एस. मोटारसायकल (किंमत ₹८०,०००/-), मोबाईल फोन्स (एकूण किंमत ₹३६,५००/-)
एकूण मुद्देमाल किंमत: ₹१,१६,५००/- नांदेड ग्रामीण भागात मोटारसायकल व मोबाईल चोरीच्या घटना वाढत असतानाच, पोलीसांनी अतिशय कुशलतेने तपास करून आरोपींना अटक केली. गुन्हेगारी पद्धतीने चोरी करून ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थलांतर करत होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही टोळी सापडली असून, यापुढे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *