कुंडलवाडी येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला मुद्येमालासह अटक – स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

नांदेड, कुंडलवाडी– दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्री 12.00 ते 12.15 च्या सुमारास बाभळी पुल ते शेळगाव थडी दरम्यान, फिर्यादी कपिल शंकरराव वाघमारे (रा. बन्नाळी, ता. धर्माबाद) आणि त्यांचा चुलत भाऊ हे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी पल्सर मोटारसायकल (MH26 CK 8682) वरून बिलोलीकडे जात असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून, खंजराचा धाक दाखवत रु. 40,000 रोख, एक मोबाईल व पल्सर मोटारसायकल जबरीने चोरली.
या प्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं 67/2025 अंतर्गत कलम 310(2), 61(2), 309(4), 3(5) भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाले होते.
या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मा. श्री. अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिला होता. गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी आरोपी विवेक विद्यासागर गजभारे (वय 20, रा. वसरणी, ता. नांदेड) आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक हे वसरणी येथील पाण्याच्या टाकीजवळ थांबले असल्याचे कळल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
जप्त मुद्देमाल:
-
₹50,000 किमतीची पल्सर मोटारसायकल (MH26 CK 8682)
-
₹2,000 रोख रक्कम (₹500 च्या 4 नोटा)
-
₹25,000 किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक नसलेली)
-
₹500 किमतीचा धारदार खंजर
-
एकूण जप्त मुद्देमाल – ₹77,500
यशस्वी कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी:
-
उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शाखा, शिंदे, सपोनि, कुंडलवाडी, महेश कोरे, पोउपनि, स्था. गु. शाखा, माधव केंद्रे, ग्रे. पोउपनि, पोहेकॉ मिलींद नरबाग, गणेश लोसरवार, पदमसिंह कांबळे, बालाजी यादगिरवाड, सिद्धार्थ सोनसळे, सुधाकर देवकत्ते, सायबर सेल नांदेडचे पोहेकॉ: राजु सिटीकर, दिपक ओढणे
सदर आरोपी व मुद्देमाल पोलीस ठाणे कुंडलवाडी यांच्या ताब्यात देण्यात आले असून, मा. पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांनी ही यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक केले आहे.
ही कारवाई नांदेड जिल्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरली असून, नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.



