महाराष्ट्रा

ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रतर्फे राज्यव्यापी आंदोलनाची तयारी – रिक्षा चालकांच्या हक्कासाठी पुन्हा एकजूट

मुंबई | दि. 24 एप्रिल 2025 : महाराष्ट्रातील तसेच मराठवाडा व नांदेड जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालकांच्या हक्क व न्यायासाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र, टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना व संलग्न संघटनांनी एकत्र येत मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

राज्यातील सर्व रिक्षा चालक संघटनांना कळविण्यात आले आहे की, विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र शासनाने स्व. धर्मवीर आनंद दिघे रिक्षा टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर सहा महिने उलटून गेले तरी या घोषणेवर कोणतीही ठोस अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाने रिक्षा चालकांची फसवणूक केल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे.

तसेच, रॅपिडो बाईक प्रवासी वाहतुकीस देण्यात आलेली परवानगी देखील रिक्षा व्यवसायासाठी घातक ठरत आहे. गतवर्षी शासनाच्या समितीकडे विरोधी अहवाल सादर करूनही सरकारने रॅपिडोला परवानगी दिली आहे, ज्यामुळे लाखो रिक्षा चालकांचे रोजगार धोक्यात येण्याची भीती आहे.

याशिवाय, खुले परवाने, ई-रिक्षा, आणि अवैध प्रवासी वाहतूक यासारख्या समस्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी, कृती समितीचे अध्यक्ष मा. श्री. शशांक राव, महासचिव मा. विलास भालेकर, व मराठवाडा अध्यक्ष अहेमद (बाबा) यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीचा तपशील:

  • दिनांक: रविवार, 27 एप्रिल 2025

  • वेळ: सकाळी 10 वाजता

  • स्थळ: मजदूर मंजिल, म्युनिसिपल कामगार भवन, स. का. पाटील उद्यानाजवळ, चर्नी रोड रेल्वे स्टेशनसमोर, ठाकुरद्वार, मुंबई – 02

नांदेड जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे आंदोलन रिक्षा चालकांच्या हक्कासाठी निर्णायक ठरणार असून, सरकारच्या धोरणांविरोधात संघटनांनी एकजूट होण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *