नांदेडच्या सृष्टी जोगदंड ची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी तर ज्ञानेश चेरलेची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड…

नांदेड दि. 25/ भारतीय धनुर्वीद्या संघटनेच्या वतीने दिनांक २४ ते २८ एप्रिल २०२५ दरम्यान यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरजमल विहार दिल्ली येथे आयोजित फायनल नॅशनल रँकिंग आर्चरी स्पर्धेसाठी नांदेडच्या सृष्टी जोगदंड ची निवड झाली आहे . तर ज्ञानेश चेरलेची बिहार येथे ४ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित ७ व्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे . अशी माहिती जिल्हा सचिव वृषाली पाटील जोगदंड यांनी दिली .
मागील वर्षातील चार राष्ट्रीय रँकिंग स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी सृष्टी जोगदंड केली आहे त्यात गोहाटीसह देहरादून , पुरी ओरीसा व हिमाचल प्रदेश येथील राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत दिल्ली येथे होणाऱ्या फायनल नॅशनल रँकिंग आर्चरी स्पर्धेत प्रथम क्रमांकाने थाटात प्रवेश मिळविला आहे . २५ ते २८ एप्रिल २०२५ दरम्यान यमुना नगर सुरजमल विहार दिल्ली येथील स्पर्धेत जुनियर रिकव्हर प्रकारात महाराष्ट्रातून ऐकमेव खेळाडू म्हणून नेतृत्व करणार आहे .
तर ज्ञानेश बालाजी चेरलेने शालेय धनुर्विधा स्पधेत केलेल्या सर्वोत्कृष्ठ कामगीरीमुळे त्याची ४ ते १५ मे २०२५ दरम्यान बिहार येथे आयोजीत ७व्या खेलो इंडीया स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघांत निवड झाली असून त्याचे प्रशिक्षण शिबी पुणे बालेवाडी येथे २५ एप्रील ते र मे दरम्यान होत आहे .
दोघांच्याही या निवडीबद्दल नांदेड जिल्हा आर्चरी संघटनेच्या वतीने सचिव तिथं जिल्हा मुख्य प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड यांच्यासह ऑलम्पिक प्रशिक्षक रविशंकर सर ,प्रफुल डांगे डॉ . मुकेश मालू डॉ . सुमेध वाघमारे , डॉ .हंसराज वैद्य नांदेड तालुका संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास भुसेवार , जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश तमलुरकर , मुन्ना कदम कोंडेकर , मालू कांबळे सतीश पाटील जाधव, बालाजी चेरले , माधव दुयेवाड , शिवाजी पुजरवाड शिवाजी पाटील इंगोले , संजय चव्हाण डॉ . विजय वडजे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ब्रिजेश कुमार प्रशिक्षिका पिंकी राणी , प्रलोभ कुलकर्णी , शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गुपीले , डॉ. राहुल वाघमारे , लक्ष्मन फुलारी , डॉ दिनकर हंबर्डे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .



