क्राईम

लिंबगाव पोलिसांची मोठी कारवाई – १३ लाखांचा अवैध वाळू उपसा मुद्देमाल जागीच नष्ट

नांदेड, दि. २८ एप्रिल २०२५ – नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या इसमांवर मोठी कारवाई करण्यात आली असून, एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई ‘ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत करण्यात आली.

पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, सरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनकर, पो.उप.नि. एन.एम. सय्यद, पोलीस कर्मचारी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

गुन्ह्याची थोडक्यात हकीकत:

दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८ वाजता मौजे बोरगाव (तेलंग) येथील नदीपात्रात दोन अनोळखी इसम दोन इंजिनच्या साहाय्याने अवैध गौणखनिज (वाळू) उपसा करत होते. पोलिसांनी छापा टाकताच आरोपी फरार झाले. त्यावेळी २ इंजिन (८ लाख रुपये किंमतीचे) आणि १० तराफे (५ लाख रुपये किंमतीचे) असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, डिझेलच्या सहाय्याने जागीच जाळून नष्ट करण्यात आला.

गुन्हा दाखल:

या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५), ६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संयुक्त पथकात सहभाग:

या कारवाईत पोलिस निरीक्षक बोधनकर, उपनिरीक्षक सय्यद, पो.कॉ. रितेश टाक, चालक सोनकांबळे, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी कुणाल जगताप, तलाठी विजय रणविरकर व संजय खेडकर यांचा समावेश होता. सदर कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *