नांदेड ग्रामीण पोलीसांची कारवाई: अवैध रेती वाहतूक करणारे २ टेम्पो पकडले, ५.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी): पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन “फ्लश आऊट” अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत बिनपरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारे दोन टेम्पो जप्त करत ५.१० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मार्गदर्शनाखालील अधिकारी:
-
मा. श्री. अबिनाश कुमार – पोलीस अधीक्षक, नांदेड, श्री. सुरज गुरव – अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, श्री. खंडेराव धरणे – अपर पोलीस अधीक्षक, भोकर, श्री. सुशीलकुमार नायक – उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा, श्री. ओमकांत चिंचोलकर – पोलीस निरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण
👥 कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार:
-
पो.उ.नि. बाबुराव चव्हाण, पो.हे.कॉ. केंद्रे (273), पो.ना. डफडे (2606), पो.कॉ. कल्याणकर (946) पो.कॉ. पवार (379)
(सर्व पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे कार्यरत)
👤 अटक आरोपी:
दत्ताराम रामजी लोंढें (वय 30), रा. असर्जन, ता.जि. नांदेड, शेख जिलानी शेख हशम (वय 35), रा. वाजेगाव, ता.जि. नांदेड
🛻 जप्त मुद्देमाल:
-
दोन 407 टेम्पो (MH-43-AD-0697 आणि MH-04-FD-4658), अंदाजे 02 ब्रास रेती एकूण किंमत: ₹5,10,000/-
🕵️ थोडक्यात हकीकत:
दिनांक 03 मे 2025 रोजी नांदेड ग्रामीण पोलीस पेट्रोलिंग करत असताना आदिती हॉटेल समोर एक टेम्पो (MH-43-AD-0697) रेतीची बिनपरवाना वाहतूक करताना आढळून आला. त्याचप्रमाणे, महात्मा बसवेश्वर पुतळा ते कौठा रस्ता या मार्गावर दुसरा टेम्पो (MH-04-FD-4658) ही रेती वाहतूक करताना पकडण्यात आला. दोन्ही ठिकाणी कारवाई करत दोन्ही टेम्पो आणि रेती असा एकूण 5.10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे आणि अंमलदारांचे कौतुक केले आहे.



