क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांची वाहतूक चोरी प्रकरणात मोठी कामगिरी: दोन आरोपी जेरबंद, मुद्देमालासह वाहन जप्त

नांदेड, एप्रिल २८, २०२५: नांदेड ग्रामीण पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करून सुमारे ₹३,००,००० किंमतीचे मारुती सुजुकी सुपर कॅरी वाहन जप्त केले आहे. ही कारवाई “ऑपरेशन फ्लश आऊट” मोहिमेअंतर्गत करण्यात आली असून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गुन्हेउकस कामगिरी पार पडली.

आरोपींची माहिती:

सर्जेराव ऊर्फ रोहीत दत्तात्रय पाटील (वय ३४), राह. करोळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, तुकाराम नामदेव म्हेत्रे (वय २७), राह. पांढरेवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

जप्त मुद्देमाल:
  • मारुती सुजुकी सुपर कॅरी वाहन (MH-44-U-3824), अंदाजे किंमत: ₹३,००,०००

 गुन्ह्याचा तपशील:

दि. १४ मार्च २०२५ रोजी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान फिर्यादी अशोक मधुकर मुंडे यांनी आपले वाहन वाडीपाटी हॉटेलसमोर चहा पिण्यासाठी थांबवले होते. त्यावेळी आरोपींनी संगणमत करून वाहन चोरून नेले. या प्रकरणी गु.र.न. ३२२/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

 पोलिसांची कार्यवाही:

पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड आणि गुन्हे शोध पथकाने सोलापुर जिल्ह्यातील करोळी येथे जाऊन तपास केला आणि आरोपींचा ठावठिकाणा शोधून त्यांच्याकडून चोरीचे वाहन हस्तगत केले.

मार्गदर्शक अधिकारी:
  • श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड,  श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड,  श्री. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, श्री. सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा

कौतुकास्पद कार्य:

या तपासात सहभागी पोहेकॉ गटलेवार, पचलींग, माने, कानगुले, तसेच सायबर सेलचे ओढणे व सिटीकर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. पोलिसांच्या या कार्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्तुतिस्पद कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *