क्राईम

जागेच्या वादातून मॉन्टीसिंघ जहागिरदार, प्रभाकर पाठक यांच्यासह १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी): दि. ६ मे / शहरातील सोमेश कॉलनीमध्ये जागेच्या वादातून तणावाची स्थिती निर्माण झाली असून, या प्रकरणात मॉन्टीसिंघ जहागिरदार, प्रभाकर पाठक यांच्यासह १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपीका दीपकराव पाठक यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ६ मे २०२५ रोजी काही व्यक्तींनी त्यांच्या मालकीच्या जागेत जबरदस्तीने प्रवेश करत तोडफोड केली आणि सीसीटीव्ही फुटेज तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच, जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या जागेचा वाद सध्या न्यायप्रविष्ट असून, दिपक पाठक आणि प्रभाकर पाठक यांनी न्यायालयात “जैसे थे” परिस्थिती राखण्याची मागणी केली होती. त्यानंतरही हा प्रकार घडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

दिपीका पाठक यांच्या तक्रारीनुसार, मॉन्टीसिंघ जहागिरदार, प्रभाकर सखारामपंत पाठक आणि अन्य १०-१५ जणांनी त्यांच्या घरात घुसून नुकसान करण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यांच्यासह पतीला संपविण्याची धमकी दिली. तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलं कामानिमित्त बाहेरगावी राहत असून, घरी केवळ ते दोघेच राहत असतात.

या तक्रारीवरून वजिराबाद पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 149(2), 190, 352, 351(2), 324(4) आणि 333 अंतर्गत गुन्हा क्रमांक 196/2025 नोंदवला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरात जागेच्या वादातून होणाऱ्या गुन्हेगारी घटनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *