क्राईम

दोन सराईत गुन्हेगारांकडून ६ चोरीच्या मोटारसायकली जप्त – स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांची यशस्वी कारवाई

 

नांदेड | ९ मे २०२५: नांदेड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून एकूण ६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांचे हे विशेष ऑपरेशन ‘फ्लश आऊट’ अंतर्गत राबवण्यात आले.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी विशाल मधुकर डोलारकर (२७), रा. अर्धापूर व जुबेरखॉन अमिरखॉन (३२), रा. मदीनानगर, अर्धापूर यांना अटक केली. दोघांनी मिळून वजीराबाद, अर्धापूर, बारड, अर्धापूर (हट्टा) या परिसरातून विविध कंपन्यांच्या ५ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

तसेच, एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून हिंगोली जिल्ह्यातून चोरलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

जप्त मुद्देमाल: होंडा शाईन – १, हिरो HF डिलक्स – २, हिरो स्प्लेंडर – २, प्लॅटीना – १, एकूण किंमत: ₹२,३०,०००/-

यशस्वी कारवाईसाठी पुढील अधिकारी व कर्मचारी उपस्थित:
श्री. अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. नांदेड, आर. व्ही. वाहुळे, सहा. पोलीस निरीक्षक, बी. ए. दासरे, पोउपनि

विशेष पथक व सायबर सेलचे अधिकारी व कर्मचारी ही कारवाई स्थानीय गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केलेली असून, त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सर्व अधिकाऱ्यांचे व अंमलदारांचे कौतुक केले आहे.

 

 

 

 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *