क्राईम

वासरी घाटावर अवैध वाळू उपसा प्रकरणी मोठी कारवाई — दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड, – प्रतिनिधी दि. १० मे २०२५ मुदखेड तालुक्यातील वासरी येथील गोदावरी नदी घाटावर अवैध वाळू उपसाच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी मोठी कारवाई करत तब्बल ₹2,00,28,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 03 हायवा ट्रक व 02 जेसीबी यंत्रे जप्त करण्यात आली असून 04 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही धाडसत्राची कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव आणि मा. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय (स्थानीय गुन्हे शाखा, नांदेड) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

जप्त मुद्देमाल: 03 हायवा ट्रक (१२ ब्रास वाळूसह): ₹1,20,28,800/-, 02 जेसीबी यंत्रे: ₹80,00,000/-, एकूण मुद्देमाल: ₹2,00,28,800/-

अटक आरोपी: नागेश चांदु कलवले (रा. कृष्णानगर, मुदखेड), श्यामसिंह संजयसिंह गौर (रा. पाथरड, हदगाव), योगेश हरी कल्याणे (रा. वासरी, मुदखेड), श्रीकांत बालाजी उमाटे (रा. वासरी, मुदखेड), तसेच एक अनोळखी जेसीबी चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. गुप्त माहितीच्या आधारे १० मे रोजी मध्यरात्री स्थानीय गुन्हे शाखेचे विशेष पथक मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वासरी घाटावर पोहोचले. घटनास्थळी जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालू असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ कारवाई करत वरील मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींविरोधात गु.र.नं 85/2025 नुसार 303(2) B.N.S., तसेच 4, 21 गौण खनिज उत्खनन अधिनियम 1957 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मा. अभिनाश कुमार यांनी ही यशस्वी कारवाई करणाऱ्या पथकाचे कौतुक केले असून, अवैध वाळू उपसाविरोधातील कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *