शहर
बौद्ध पौर्णिमेनिमित्त चंद्रबोधी यांच्या जाहीर प्रवचनाचे आयोजन

नांदेड, १०- तरोडा बु परिसरातील वैशालीनगर येथील दीपंकर कुंज विहार येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त धम्मचारी अनागारिक चंद्रबोधी यांचे दि. १२ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता जाहीर प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रवचनासाठी जिल्ह्यातील सर्व बौद्ध बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेडचे चेअरमन पद्मगर्भ व पद्मसेन यांनी केले आहे.



