नांदेड पोलिसांची कारवाई: सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर ठोस पावले

नांदेड | 12 मे 2025 — प्रतिनिधी, नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन व शांतता भंग करणाऱ्यांवर नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्री सुरज गुरव यांच्या सूचनेनुसार विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आली.
भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई इ-स्केअर रोड येथे दोन इसम सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आढळले. त्यांच्यावर म.पो.का. कलम 110/117 अंतर्गत गुन्हा दाखल.
वजिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि पक्की चाळ परिसरात प्रत्येकी एक, एकूण दोन इसमांवर कारवाई. दोघांनाही ताब्यात घेऊन म.पो.का. 110/117 अंतर्गत गुन्हा दाखल.
शिवाजीनगर पोलीस स्टेशन नाना-नानी पार्क येथे एका इसमावर कारवाई. सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना सापडल्याने गुन्हा नोंद.
इतवारा पोलीस स्टेशन इतवारा परिसरात एक इसम अटक. त्याच्यावर म.पो.का. कलम 110/117 अन्वये गुन्हा.
नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन ढवळे कॉर्नर येथे दोन इसमांवर कारवाई. शांतता भंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक मा. श्री अभिनाश कुमार यांनी सांगितले की, “सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी कायदा-सुव्यवस्थेचा आदर राखावा.” नांदेड पोलिसांची ही मोहीम भविष्यातही सुरू राहणार असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



