नांदेड: प्रामाणिक रिक्षा चालकाने विसरलेली महत्त्वाची बॅग परत केली; टायगर संघटनेच्या मदतीने परत झाली बॅग

नांदेड, 11 मे 2025 – आज सकाळी 10:30 वाजता नांदेडमध्ये एक प्रामाणिकपणाचे उदाहरण पाहायला मिळाले. कतर्वदक्ष रिक्षा चालक शेख करीम शेख चांद, रा. मगदूम नगर, शिवाजीनगर, हे नेहमीप्रमाणे प्रवासी घेण्यासाठी कौठा येथील नवीन बस स्थानक ते रेल्वे स्टेशन या मार्गावर आपली ऑटो रिक्षा चालवत होते.
याच दरम्यान, लातूर येथील डॉ. सोपान कोल्हे हे प्रवास करत होते आणि ते आपली एक मोठी बॅग रिक्षामध्ये विसरून गेले. शेख करीम घरी परतल्यावर त्यांना बॅग रिक्षामध्ये असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ आपल्या जावयाशी, शेख शारूख यांच्याशी संपर्क साधला, जे स्वतःही रिक्षा चालक आहेत.
शेख शारूख यांनी टायगर ऑटो संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहमद (बाबा) यांच्याशी संपर्क केला. अध्यक्षांनी संपूर्ण माहिती घेऊन सांगितले की बॅग रेल्वे स्टेशनपर्यंत विसरली गेली आहे आणि डॉ. कोल्हे गंगा नगर एक्सप्रेसने मथुरा येथे जात आहेत.
बॅग परत करण्यासाठी तात्काळ रेल्वे स्टेशन गाठण्यात आले. बॅगमध्ये नवीन कपडे, लहान मुलांचे कपडे, औषधे व इतर महत्त्वाच्या वस्तू होत्या. बॅग सुरक्षितपणे डॉ. कोल्हे यांच्याकडे परत करण्यात आली.
डॉ. सोपान कोल्हे (रा. लातूर, संपर्क: 9272440900) यांनी रिक्षा चालक शेख करीम, शेख शारूख व टायगर संघटनेचे अध्यक्ष अहमद बाबा यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या प्रामाणिकतेचे व तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. नांदेडमधील प्रामाणिक रिक्षा चालकांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले आहे.



