भोकर पोलिसांची मोठी कारवाई – ३.१३ लाखांची अवैध देशी-विदेशी दारू जप्त, दोन आरोपी ताब्यात

भोकर | ११ मे २०२५ – नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण ३,१३,०१०/- रुपयांचा अवैध दारूचा साठा व वापरलेली टाटा इंडिका व्हिस्टा कार जप्त केली आहे. दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या “ऑपरेशन फ्लश आऊट” मोहिमेंतर्गत भोकर पोलिसांनी ही कारवाई केली. अपर पोलीस अधीक्षक श्री. खंडेराय धरणे व श्री. सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
कारवाई करणारे अधिकारी: पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पो.हे.कॉ. सोनाजी कानगुले, पो.हे.कॉ. विष्णु खिल्लारे, पोकॉ. प्रमोद जोंधळे
ताब्यात घेतलेले आरोपी: पवनकुमार लक्ष्मण पुरमोड, रा. रहाटी, ता. भोकर, सुभाष चंद्रकांत वाघमारे, रा. नेहरू नगर, भोकर
जप्त मुद्येमालाचा तपशील: देशी दारू (भिंगरी संत्रा) – 384 बाटल्या (180 मि.ली.), किंमत: ₹26,880/-, देशी दारू (भिंगरी संत्रा) – 118 बाटल्या (90 मि.ली.), किंमत: ₹4,130/-, रॉयल स्टॅग – 20 बाटल्या (180 मि.ली.), किंमत: ₹3,800/-, मॅकडोवेल नं.1 – 20 बाटल्या (180 मि.ली.), किंमत: ₹3,200/-, वाहन: टाटा इंडिका व्हिस्टा (MH-21-V-5310), अंदाजे किंमत: ₹2,75,000/- एकूण जप्त मुद्देमाल: ₹3,13,010/-
११ मे २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ७ वाजता पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आंबेडकर चौक ते भोकर बसस्थानक रस्त्यावर वाघमारे हॉस्पिटलजवळ संशयित कार पकडली. पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात सीलबंद देशी-विदेशी दारू आढळून आली. आरोपी बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाल्यावर दोघांना ताब्यात घेण्यात आले.
भोकर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४२/२०२५, भादंवि कलम ६५(ई), ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक सदर कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांनी कारवाई करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे व अंमलदारांचे कौतुक केले आहे.



