क्राईम

नांदेडमध्ये गोळीबाराची थरारक घटना – एक ठार, एक जखमी; गुन्हेगारी टोळ्यांची दहशत पुन्हा वाढली

 

नांदेड | ११ मे २०२५ – नांदेड शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडून शहर हादरले आहे. वसरणी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ रविवारी सकाळी ११ वाजता तिघांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाला. या हल्ल्यात शेख परवेज (२५) याचा जागीच मृत्यू झाला, तर तेजासिंग बावरी हा गंभीर जखमी झाला आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आशु पाटील उर्फ कमलेश लिंबापुरे याच्यासह शेख परवेज व तेजासिंग बावरी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. वाद टोकाला गेल्यानंतर कमलेश लिंबापुरे याने परवेज व तेजासिंगवर गोळी झाडली.

दोन महिन्यांपूर्वीच गुरुद्वारा परिसरात घडलेल्या गोळीबारानंतर शांत झालेली हवा पुन्हा एकदा अशांत झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

घटनेनंतरची स्थिती: शेख परवेज याचा जागीच मृत्यू, तेजासिंग बावरी गंभीर जखमी, रुग्णालयात दाखलपोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कमलेश लिंबापुरे फरार असून, त्याच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हत्येचे नेमके कारण शोधले जात आहे.

शहरात वाढती गुन्हेगारी चिंता निर्माण करणारी ठरत असून, नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *