क्राईम
कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

नांदेड प्रतिनिधी : इयत्ता दहावी परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे सांगवी भागातील अंबा नगर मधील रोशनी रवींद्र पगारे या विद्यार्थिनीने राहत्या घरात आत्महत्या केली. सांगवी भागातील अंबा नगर मध्ये रोशनी रवींद्र पगारे वय 16 वर्ष ही मुलगी राहत होती. तिला दहावी परीक्षेमध्ये 74% मार्क पडले. कमी मार्क पडल्यामुळे ती तणावांमध्ये होती.
या मानसिक तणावामुळे तिने 14 मे रोजी दुपारी ३:३० वाजता राहत्या घरात आत्महत्या केली. तिची आई घरकाम करणारी असून या मुलीला वडील व भाऊ नसून एक लहान बहिण 10 वी मध्ये शिकत आहे, याबाबतची माहिती विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साखरे यांनी दिली.



